हेमा टोबियम जी
Appearance
डॉ.रा.कृ. गाडगीळ ऊर्फ हेमा गाडगीळ यांनी त्यांच्या गुहागर जवळच्या गिमवी गावात आढळणाऱ्या ’सिस्टोसोमिया हिमा टोबियम’ नावाच्या एका असाध्य रोगावर संशोधन करून एक लस शोधून काढली. त्या प्रयत्नांची हकीकत आणि डॉ. गाडगीळांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आयुष्य प्रवासाची सांगितलेली साध्या व रसाळ भाषेतील ही सरस आत्मकथा आहे.
पुस्तकाचे नाव
[संपादन]गाडगीळांच्या नावातील ’हेमा’, रोगाच्या नावातील ’टोबियम’, गाडगीळ, गुहागर आणि गिमवी या शब्दांच्या इंग्रजी स्पेलिंगमधील ’जी’ हे सर्व मिळून पुस्तकाचे ’हेमा टोबियम जी’ हे नाव बनले आहे.