हिरोजी इंदुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिरोजी इंदुलकर (देशमुख) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगड चे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इंदलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.

शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपविली होती. गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले.त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजे बेहद्द खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारलं! हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात. हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीन देवू. तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले. महाराज म्हणाले! हिरोजी बोला. त्यावेळी हिरोजी इंदलकर म्हणाले. राजं आम्हाला काय बी नग, फक्त राजांनी एक अनुमती द्यावी. आणि महाराज म्हणाले बोला हिरोजी बोला. तेव्हा हिरोजीं म्हणाले राज, या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. आणि राजांनी त्यांना एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली. म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले कि हिरोजी इंदलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल.त्या पायरीचा फोटोही इथे देत आहोत.

या आपल्या शिलालेखात त्यांनी "सेवेचेठायी तत्पर हिरोजी इंदलकर…. … " असे म्हणून आपण महाराजांचे निष्ठावंत सेवक आहोत हेच दाखवून दिले.व राजधानी रायगड याचं बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी आपलं घरदार विकून पूर्ण केले होते.