हिंदू वारसा कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाहा हिन्दु वारसा कायदा १९५६

कायदा क्र. ३० वर्ष् १९५६, १७ जुन १६५६ 

हा कायदा जम्मु - काश्मिर् वगळता इतर भारताच्या सर्व राज्याना लागु आहे.

हा कायदा हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माच्या सर्व व्यक्तिना लागु होतो.

खालिल पैकी कुठ्ल्याही ती व्यक्ति ह्या हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या समाज्याची आहे असे समजण्यात येते.

 1. ज्याचे आई-वडील (दोघहि ) हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माचे आहेत.
 2. ज्याचे आई-वडील (दोघां पैकी एक ) हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माचे आहेत.आणि त्यानी पालन पोषण केले आहे.
 3. अशी व्यक्ति जीने धर्मांतर करून हिन्दु, जैन, बुद्ध , शिख या धर्माचा स्विकार केला आहे.

‘ वारस ‘ म्हणजे अशी व्यक्ती ( स्त्री , पुरुष कोणीही ) जी या कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या संम्पती मधे वाटेकरी होऊ शकते.

हा कायदा पुढिल संम्पत्तीना लागु होत नाही.

 1. विशेष विवाह कायदा १९५४ च्या कलम २१ च्या तरतुदीच्या अन्वये ज्या मालमत्तेची भारतीय वारसा कायदा १९२५ प्रमाणे वाटणी अथवा विभागणी झाली आहे.
 2. अशी मालमत्ता जीचे हस्तांतरण अथवा वारसा ह्क्क हा एकाच वारसाला देण्यासंदर्भात हा कायदा अंमलात येणेपुर्वीच तत्कालीन राजे, संस्थाने आणि तत्कालीन भारत सरकार यांच्यात तह अथवा करार झाला आहे.
 3. कोचिन संस्थानचे महाराजानी २९ जुन १९४९ रोजी विशेष अधिकारा अंतर्गत राजवाडे, महाल, जमीन जुमला अथवा त्यांच्या देखरेखी साठी विशिष्ट मंडळ याना दिलेले अधिकार.

वारसा हक्क वाटणी संदर्भातील नियम (पुरुषांसंदर्भात )

 1. परीशिष्ट क्र १ मधे दिलेले वारस
 2. परीशिष्ट क्र १ मधे दिलेल्या वारसां पैकी कोणीही वारस नसतील तर परीशिष्ट क्र २ मधे दिलेले वारस
 3. परीशिष्ट क्र १ व २ मधे दिलेले वारसां पैकी कोणीही वारस नसतील तर परीशिष्ट क्र ३ मधे दिलेले नातेवाईक

वारसा हक्कांची वाटणी करताना ती सर्वसाधारणपणे परीशिष्ठातील दिलेल्या क्रमाने केली जाते उदा. परीशिष्ठातील १ मधील क्र. १ च्या वारसाना क्र. २ मधील वारसाच्या आधी प्राधान्य दिले जाते व हा क्रम वारसदार मिळेपर्यत चालु राहतो.

विभागणी करावयासंबंधिचे नियम[संपादन]

 1. मयत व्यक्तीच्या पत्नीला ( एका पेक्षा जास्त असल्यास सर्व पत्नीना मिळुन् ) एक भाग
 2. हयात असलेल्या प्रत्येक मुलाला अथवा मुलीला आणि हयात असल्यास आईला प्रत्येकी एक् भाग
 3. जर मयत व्यक्तिचा मुलगा अथवा मुलगी तो हयात असतानाच निधन पावलेले असतील तर त्याना प्रत्येकी एक भाग.
  1. जर मुलगा मयत असेल तर त्या मुलाच्या पत्नीला ( एका पेक्षा जास्त असल्यास त्या सगळ्याना मिळून ) त्याच्या मुलाला , मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे.
  2. जर मुलगी मयत असेल तर त्या मुलीच्या मुलाला , मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे.


Onkar sathe (चर्चा) १६:३७, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)