हिंदुस्तानी राग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[[File:The Pantheon of Indian Musical Instruments (5751143650).jpg|thumb|विविध भारतीय वाद्ये].'क' पासुनच्या रागांची यादी

प्रस्तावना[संपादन]

भारतीय किंवा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील 'राग' ही एक मौलिक संकल्पना आहे.राग ही एक विवक्षित स्वररचना असते. राग शब्द रञ्ज या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे.रञ्ज म्हणजे रिझविणे ,मनाला आनंद देणे,सुखकर वाटणे असा अर्थ आहे.राग हा एक योगरूढ शब्द आहे. रागाची व्याख्या बृह्द्देशी ग्रंथात केली आहे- स्वरवर्णविशिष्टेन ध्वनिभेदेन वा जन:|रज्यते येन कथित:स राग: संमत: सताम् || स्वर आणि वर्ण यांनी युक्त असा ध्वनीविशेष रंजक म्हणजे मनाला रिझविणारा असतो त्याला पंडित 'राग' असे म्हणतात.[१]

स्वरूप[संपादन]

राग म्हणजे केवळ स्वरावली नव्हे तर तो असा एक स्वरगुच्छ असतो की ज्यामध्ये नादसौदर्य निर्माण करण्याची व स्वरांचे अनेक आकृतीबंध निर्माण करण्याची क्षमता असते.आरोह,अवरोह ,वाडी व संवादी यांनी युक्त असा स्वरसमूह म्हणजे राग.पाचही चल स्वराचे वर्ग केले आहेत ज्यांना मेल असे म्हणतात.मेल शब्दाला हिंदुस्थानी संगीतात थाट हे नाव आहे.दक्षिणेकडचे किंवा उत्तरेकडचे सर्वच राग कोणत्याना कोणत्या तरी मेलातून उत्पन्न झाले आहेत.की.भातखंडे यांनी १० मेलांची पद्धत किंवा थाटपद्धती पुरस्कारली व ती प्रचारात आणली.प्रचारातील सर्व राग स्वर सादृश्याचा निकष लावून १० थाटात वर्गीकृत करून टाकले.[२]

थाट संकल्पना[संपादन]

१.बिलावल
२.खमाज
३.कल्याण
४.काफी
५.मारवा
६.पूर्वी
७.आसावरी
८.तोडी
९.भैरव
१०.भैरवी

वर दिलेल्या थाटातून राग उत्पन्न होतात.

रागाचे स्वरूप[संपादन]

राग सिद्ध होण्यासाठी स्वरांचे विशिष्ट प्रकारचे आरोह व अवरोह निश्चित केले गेले आहेत.वेगवेगळे राग ओळखण्यासाठी त्यांना वेगवेगळी नावे दिली गेली आहेत.

शुद्ध राग-ज्या रागांचा स्वरविलास करताना अन्य कोणत्याही रागांचा भास होत नाही किंवा आत्याची छाया दिसत नाही अशा रागांना शुद्ध राग म्हणतात.

छायालग-ज्यात थोडीबहुत अन्य रागाचे छाया दिसते त्यांना छायालगराह म्हणतात.

संकीर्ण-ज्यांच्या स्वरविलासात दोहोंपेक्षा अधिक रागांची छाया दिसून येते त्यांना संकीर्ण राग म्हणतात
[३]

रागातील मुख्य स्वराला वादी असे म्हणतात.वादी स्वराच्या खालोखाल महत्त्व असलेल्या स्वराला संवादी असे म्हणतात.वादी स्वराला रागाचा राजा असे म्हणतात.

पद्धती[संपादन]

आपल्या प्राचीन ग्रंथात रागगायनाचे दोन प्रकार सांगितले आहेत. १.अनिबद्ध गायन म्हणजे ज्या गायनात बंदिश नाही अर्थात तालबद्ध शब्दरचना नाही,ज्यात तालही नसतो व सार्थ शब्दही नसतात -अर्थात आलापगायन
२.निबद्ध गायन म्हणजे बंदिशींच्या चिजा-तालबद्ध गीतरचना [४]

  1. ^ आचरेकर बा.गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र (१९७४)
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  4. ^ डॉ.रातरंजनकर श्री.ना. संगीत परिभाषा (१९७३)