हार्पून (क्षेपणास्त्र)
Jump to navigation
Jump to search
हार्पून क्षेपणास्त्र (इंग्लिश: Harpoon ;) हे इ.स. १९७७ साली विकसित करण्यात आलेले अमेरिकेचे क्षेपणास्त्र आहे. याचे विकसन व उत्पादन बोइंग कंपनीद्वारे केले जाते. हे एक क्षितिज-समांतर, जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे. विविध आवृत्त्यांगणिक याचा पल्ला ९३ कि.मी. ते २८० कि.मी. असून यातून २२१ किलोग्रॅम वजनाची उच्चक्षम स्फोटके वाहून नेली जाऊ शकतात. सर्वसाधारण हार्पून क्षेपणास्त्रांत 'अॅक्टिव्ह रडार होमिंग' ही रडार-मार्गदर्शन क्रूझ यंत्रणा वापरली जाते. तसेच शत्रूच्या रडारसंवेदकांना व अवरक्त तपासनीस यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी 'सी स्कीमिंग' तंत्राने जवळजवळ समुद्रापृष्ठास लागून हे क्षेपणास्त्र डागता येते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- बोइंग संकेतस्थळावरील अधिकृत पान (इंग्लिश मजकूर)
- हार्पून आवृत्त्या व सुधारित क्षेपणास्त्रांचे तपशील (इंग्लिश मजकूर)