हवाई सुरक्षा यंत्रणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शत्रूच्या हवाई मार्गाने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या यंत्रणेस अथवा व्यवस्थेस हवाई सुरक्षा यंत्रणा (एर डिफेन्स सिस्टम) म्हणतात.

या यंत्रणेचे कार्य, शत्रू हल्ल्यादरम्यान त्यांची बॉम्बफेकी विमाने, (रडारपासून) छुपी लढाऊ विमाने, सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे आदींना शोधणे,त्याचा मागोवा घेणे व पर्यायांचा वापर करून त्यांना लक्षावर पोचण्याआधी नष्ट करणे अशा प्रकारचे असते.अत्याधुनिक लढाईत या यंत्रणेचे स्थान बरेच महत्त्वाचे असते.