Jump to content

हरेंद्र जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव

दहा हजाराहून अधिक काव्यांचा हा निर्माता ज्याने आयुष्यातील ६० वर्षाहुन अधिकचा काळ हा कलेच्य माध्यमातून समाजप्रबोधनासाठी खर्च केला आहे. जनसामान्याचा मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाजबांधवान पर्यंत समजप्रबोधनात्मक विचार पोहोचविण्यात यशस्वी झाले. फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांची मशाल त्यानी नेहमीच आपल्या लिखाणामधून धगधगत ठेवली. आणि म्हणूनच आजही "पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा", " हे खरंच आहे खर श्री भिमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर" तसेच "हे जयंती दिना ही तुला प्रार्थना होऊ हे या दिनी भीम जन्म पुन्हा". ही गीते ऐकताना शरीरात आजही एक वेगळीच उर्जा निर्माण होते. आंबेडकरी चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले त्यापैकीच एक कवी म्हणजे आयु. लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव.

जीवन

[संपादन]

जिल्हा नाशिक.मधील मिग-ओझर हे मूळ गाव जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीशे तेहेतीस (१६/०२/१९३३). लहानपणापासूनच लेखनाची आणि समाजकारणाची आवड असलेले लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव , १९४७ साली सातवी पास झाल्यानंतर पुढे शिक्षण घेत असताना ही आवड ध्येयात पारावर्तीत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची घट्ट पकड आणि उराशी बाळगलेले समाजकारणाचे ध्येय ज्याला अर्थकारणाचा किंचितही लवलेश नव्हता. अश्या गाण्याचा जलशा संपल्यावर सर्वाना एक नारळ आणि सव्वा रुपया देऊन गावातील लोक सत्कार करीत असत आणि तेच मानधन लाख मोलाच ठरत असे पुढल्या गावातील जलश्यासाठी पुढे १९५८ साली मुंबईला आल्यानंतर शिक्षकी पेशा पत्करला पण गण्याच वेड मात्र चालूच होत. हळू हळू ह्या जलश्याचे रूपांतर कव्वाली मध्ये होत गेले. घाटकोपर येथे किसन खरात आणि पार्टी कवी लोककवी हरेंद्र जाधव अशी कव्वाली पार्टी निर्माण केली पहिलाच सामना झाला तो प्रल्हाद शिंदे यांच्या सोबत बोरीबंदर येथे. अश्या कव्वाली सामन्यांमधे ते शीघ्रकवी म्हणूनही ओळखले जात असत.श्रोत्यांचे मिळणारे अमाप प्रेम हाच सर्वात मोठा मोबदला हे लोककवी हरेन्द्र जाधवांचे समाधानाचे बोल.आंबेडकरी चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले त्यापैकीच एक कवी म्हणजे आयु. लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव. १९५८ साली मुंबईत आल्यावर शिक्षिकी पेशा पत्करला. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात ३३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरथ होते , पुढे मुख्यध्यापक ह्या पदावरून १९९२ साली निवृत्त झाले.

आंबेडकरी चळवळीत सहभाग

१९५० साली नाशिकला गंगातीरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठी सभा होती त्या सभेत "बाबांची मोटार आली, गर्दीही हटवा" हे पहिले भीमगीतं लिहिले आणि गायले देखील. त्यांनी लिहिलेली भीमगीत आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या अनेक पिढयांसाठी  मार्गदर्शक ठरतील फुले, शाहू, आंबेडकरवादी, विचारांची मशाल सदैव प्रज्वलित ठेवतील. चौफेर लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ निस्वार्थीपणे खेड्यापाड्यात पोहोचविली, म्हणूनच आजही "पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा", " हे खरंच आहे खर श्री भिमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय  हो जगभर" तसेच  "हे जयंती दिना ही तुला प्रार्थना होऊ हे या दिनी भीम जन्म पुन्हा". ही गीते ऐकताना शरीरात आजही  एक वेगळीच उर्जा निर्माण होते.

"आले किती गेले किती मोजणी तुम्हीच करा, बेरजेत भीम धरा  तरच होईल हिशोब पुरा"

अश्या गाण्याचा जलशा संपल्यावर सर्वाना एक नारळ आणि सव्वा रुपया देऊन गावातील लोक सत्कार करीत असत आणि तेच मानधन लाख मोलाच ठरत असे पुढल्या गावातील जलश्यासाठी. हळू हळू ह्या जलश्याचे रूपांतर कव्वाली मध्ये होत गेले. घाटकोपर येथे किसन खरात आणि पार्टी कवी लोककवी हरेंद्र जाधव अशी कव्वाली पार्टी निर्माण केली जीचा पहिलाच सामना झाला तो प्रल्हाद शिंदे यांच्या सोबत बोरीबंदर येथे. अश्या कव्वाली सामन्यांमधे ते शीघ्रकवी म्हणूनही ओळखले जात असत.

"आंबेडकर तो माणूस वादळाला नमविणारा, मूकयाला वाचा देऊन पांगळ्याला चालविणारा

संघर्षाचा जळता दिवा, दिला आम्हाला प्रकाश नवा, असे कोणी दुसर देईल का ?

माझ्या भीमरायावाणी, कुणी पुढारी होईल का?"

अशी युगसाक्षी गीत लिहिणारा कवी लेखक म्हणजे लोककवी हरेन्द्र  हिरामण जाधव.

आंबेडकरी चळवळीत अनेक गुणी लोककलाकार निर्माण झाले त्यापैकीच एक कवी म्हणजे जनसामान्याचा मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून  त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे  ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाजबांधवान पर्यंत समजप्रबोधनात्मक विचार पोहोचविण्यात यशस्वी झाले.

लोकगीत

गाण्यांच्या तबकड्या, कॅसेट (ध्वनीफीत), सीडी, ऑडिओ-सीडी, व्हि-सीडी आणि सध्या सोशल मीडिया ही अनेक स्थित्यंतर पाहिली पण गीत मात्र तीच आहेत सहा दशकाहून अधिक काळ रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनावर  अधिराज्य करणारी.  जनसामान्यांच्या वेदना, संवेदनां गुंफणारी गीते म्हणजे लोकगीते.

हरेंद्र जाधव यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित गीतांची संख्या दहा हजाराहून अधिक आहे, त्यांच्या ६०० हुन अधिक ध्वनिफिती लोकार्पित झाल्या आहेत  ज्यात सारेगमा, टी-सिरीज, व्हीनस, सरगम, विंग्स म्युझीक, टिप्स, प्रिझम,सुयोग, स्वरानंद इत्यादी नामवंत संगीत कंपनीचा समावेश आहे. अनेक मान्यवर संगीतकार आणि गायकांनी ती संगीतबद्ध आणि गायली आहेत. १९६७ साली हिस मास्टर व्हॉइस म्हणजेच  एच. एम व्ही साठी गीते लिहिण्याची संधी प्राप्त झाली आणि शेकडो गीत ध्वनिमुद्रित झाली, ज्या गीतांचा उल्लेख जेव्हा  मनामनात जपलेली गीत, परिवर्तनवादी गीत, चळवळीची गाणी  युगसाक्षी गीत, हृदयात जपलेली गीत असा होतो तेव्हा केलेल्या कामाची पावती मिळते. जनमाणसांच्या वेदना, संवेदना आणि भावना अचूक ओळखून लिहिलेली गीत आज सहा दशक लोटली तरीही आवर्जून ऐकली जातात. रसिक मायबाप प्रेक्षकांचे मिळणारे  प्रेम आणि आदर  मनाला समाधान देते.

काही अजरामर गीतांची सूची पुढील प्रमाणे आहे.

१.  आता तरी देवा मला पावशील का? सुख ज्याला म्हणत्यात ते दावशील का? - प्रल्हाद शिंदे [१]

२.  तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे  चरणी ठेवितो माथा - प्रल्हाद शिंदे [२]

३.  दिसते कोणाची गाडी हिरव्या रंगाची जोडी जा गं सयांनो कुणी पाहून या - प्रल्हाद शिंदे

४.  गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची - प्रल्हाद शिंदे

५.  कळलं नव्हतं पाहिलं असा घोटाळा होईल - प्रल्हाद शिंदे

६.  देवा मला का दिली का दिली बायको अशी शिकून थकलो मी दरदिवशी - प्रल्हाद शिंदे

७.  सखूच्या नाथानीवरी चमकतो हिरा - श्रावण यशवंते

८.  सांगतो मी मजेदार चुटका - आनंद शिंदे

९.    महागाईचा काळ असा  - गोविंद म्हशीलकर

१०.  बे एके बे बाळांनो एक थोडं बाळांनो एक थोडं - शाहीर साबळे [३]

११.  मला हवा गं असाच संसार हवा - सुलोचना चव्हाण

१२. घेतलंय मनावर - शाहीर विठ्ठल उमप

१३. वारं तुझं घुमु दे - शाहीर विठ्ठल उमप

१४. बारा महिन्यांचे सण येती सव सवडीनं - कृष्णा शिंदे

१५. उदे उदे तुझा गजर झाला - अनुराधा पौडवाल

१६. सुखी ठेव बाळ गोजिरं - अनुराधा पौडवाल

१७. आयुष्य हे घडीचे सर्वांना जावयाचे - स्वप्नील बांदोडकर

१८. दुनिया सारी सोड परी आई बाप हे सोडू नको -  स्वप्नील बांदोडकर

१९. साई भक्तिज्योत - स्वप्नील बांदोडकर

२०. अवतार कार्य - अजित कडकडे

२१. सांग गुरूराया येशील कधी - सुरेश वाडकर  

२१. गोंधळ - अजित कडकडे

२२. असं प्रीतीच वादळ सुटलं - शकुंतला जाधव

२३. नव रातीच्या दिसामाधी   - वैशाली सामंत

२४. रसिकजनाला लोककलेला, आमचा मुजरा महाराष्ट्राला - किसन खरात

२५. तुझा खर्च लागला वाढू  - प्रल्हाद शिंदे गायक आणि संगीतकार मधुकर पाठक [४]

काही लोकप्रिय लावण्या, लग्नगीतं, अभंग, गवळणी, भजन, भक्तीगीत

१.   माझ्या नवऱ्यानं सोडलीया दारू बाय देव पावलाय गो  - रोशन सातारकर

२.   माझ्या लग्नाचा बेंडबाजा वाजतो - सुलोचना चव्हाण

३.   बोलणं झालं आईच बाबांचं लगीन ठरलं ताईच - कृष्णा शिंदे

४.   मांडव दारी आली ही वरात - श्रावण यशवंते

५.  शुभमंगल घ्या उरकून  बसलंय वऱ्हाडी ठुमकून - कृष्णा शिंदे

६.    ढोलताशा पडघम सनई वाजे - आनंद शिंदे

७.    खेळ हळदीचा खेळती - शकुंतला जाधव

८.    लग्नाच्या रेशीम गाठी - रंजना शिंदे [५]

९.  संसार नौका न्या हो तिरा - सुरेश वाडकर

१०. शिर्डीचा शुक्रतारा - आनंद शिंदे

११. कितींदा गाठोडं बांधू - वैशाली सामंत

१२. कोणी म्हणा खरे - श्रीकांत नारायण

१३. तुळजापूरच्या घाटात - उत्तरा केळकर

१४. जत्र साठी गं - सुचित्रा भागवत

१५. अभंग तुक्याचे - साधना सरगम

कथा

महाराष्ट्रातील लोककला संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी कथा ह्या लोककला प्रकाराचे योगदान कायम स्मरणात राहील. २००० सालच्या सुमारास लोककवी हरेंद्र जाधव यांने लिहिलेल्या ७५ हुन अधिक कथा आणि १५० हुन अधिक गीते लोककलावंत छगन चौगुले यांनी सादर केल्या गायल्या. त्यातील काही कथा आणि गीते इथे नमूद करीत आहे.

१.  कथा गुजरात भूकंपाची

२.  कथा भीमरायाची

३.  कथा संत कबीराची

४.  कथा गुलब्या नाईकांची

५.  शिवरायांची पराक्रम कथा

६.  कथा संत कान्होपात्राची

७.  कथा भक्त प्रल्हादाची

८.  कथा भाऊबहीणीची

९.  कथा ज्ञानेश्वर समाधीची

१०. कथा गौतम बुद्धांची

११. कथा भाऊ बहिणीची

१२. कथा हुंडाबळीच्या

१३. कथा श्रावण बाळाची

१४. श्री त्रंबकेश्वर अमृतवाणी - स्वप्नील बांदोडकर

१५. भीमराया माझा भारी गुणवान

१६. धन्य धन्य हो कानिफनाथ

१७. जशी पंढरी तशीच शिर्डी

१८. कथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची

१९. कथा श्रावण बाळाची

२०. कथा ज्ञानेश्वर समाधीची कोळीगीत

कोळीगीत

१५ वर्ष ट्रॉम्बे येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरथ असल्यामुळे कोळी भाषा अवगत झाली आणि अनेक कोळीगीतंही लिहिली जी प्रचंड लोकप्रिय झाली.

१. डोलकरा माझे डोलकरा - सुलोचना चव्हाण

२. आग्रान  गेलू बाय डोंगरांन गेलू गो पायानं काटा माझे भरलान गो - रंजना शिंदे

३. एकवीरा आईच्या जाऊ डोंगराला - अनुराधा पौडवाल

४. मिरवीत पालुकी  चालली बाय एकवीरा माउली - आनंद शिंदे

५. स्वप्नात आली एकवीरा - अनुराधा पौडवाल

६. वेदमाता कार्ल्याची - अनुराधा पौडवाल

लोकनाट्ये

१. आम्ही दारू सोडली - दारूबंदीवर ह्या विषयावर आधारित

२. साक्षर करूया खेड - साक्षरतेवर ह्या विषयावर आधारित

३. वाढवू शोभा धरतीची - पर्यावरणावर ह्या विषयावर आधारित

४. मानवतेचे मंदिर - एकात्मतेवर ह्या विषयावर आधारित

५. हे तुम्हीच ठरवा - एड्सवर ह्या विषयावर आधारित

६. एकाच वाट - सीमोल्लंघनांवर ह्या विषयावर आधारित

७. मानवता हाच खरा धर्म - मानवता ह्या विषयावर आधारित

८. राजाला भेटला गुरू - अंधश्रद्धा ह्या विषयावर आधारित

९. साधू मागे वधू - प्रयत्न ह्या विषयावर आधारित

१०. भारतरत्न भीमराया - डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे जीवन चरित्रावर आधारित

११. एक होता राजा - कर्म ह्या विषयावर आधारित

१२. कुणाच्या खांद्यावर - तीन तासांचे सामाजिक लोकनाट्य

१३. मुजरा महाराष्ट्राला - सांस्कृतिक तीन तासाचा कार्यक्रम

१४. गीत भीमायण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे जीवन चरित्रावर आधारित सांगीतिक कार्यक्रम

पोवाडे

१.  जय नामांतर

२.  शिवाजी महाराजांचा पोवाडा

३.  गौतम बुद्धांचा पोवाडा

४.  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा

५.  जिच्या हाती पाळण्याची दोरी

६.  दहा दलितांचे बलिदान

७.  वारणेचे दैवत (तात्यासाहेब कोरे)

८.  राजीव गांधी

९.  शाहिरी लोककला मंच

१०. विष्णू बाळा पाटील

११. दत्ता सामंत

१२. आण्णासाहेब पाटील

१३. दहा दलितांचे बलिदान

कार्य

गौरवशाली महाराष्ट्राची परंपरा सांगणारी, फुले शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सुंदर अशी शिंपण करून सुंदर असा मळा फुलविता आला.  ह्या शब्दांच्या मळ्यात अनेक सामाजिक गीत, लोकगीत, भजन, गझल, कविता, बालगीत, कोळीगीत, अभंग,                गण-गवळण, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य आणि भीमगीतं आहेत. १९४७ पासून सुरू झालेल्या सहा दशकांच्या प्रवासात अनेक स्थितंतरे  त्यांनी अनुभवली.   तमाशा, जलसा, कव्वाली, जयंतीचे कार्यक्रम, तबकड्या, कॅसेट, सीडी, व्ही-सीडी ऑडिओ-सीडी, आकाशवाणी, दूरदर्शन, आणि अलीकडच्या काळात यु ट्युब, माध्यम बदलली पण प्रवास मात्र निरंतर सुरूच आहे नुकत्याच एका ई बुक साठी काही गझल लिहिल्या.

१९८० च्या दरम्यान "बौद्ध कलावंत संगीत अकॅडमी" ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली नोंदणीकृत अशी संस्था स्थापित झाली ज्यात अध्यक्ष आणि संस्थापक होते वामनदादा कर्डक ह्या संस्थेच्या मुख्यसचिव ह्या जबाबदारीच्या पदावर काम करता आल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व थरातील लोककलाकारांशी एक आपुलकीचे आणि नाते निर्माण होऊन छान असा  सुसंवाद साधता आला.

सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील चळवळीतले लोककवी हरेंद्र जाधव यांचे  योगदान आणि सहा दशकाहुन अधिकचा अभूतपूर्व, जिवंत, चैतन्यमय आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून केलेला  प्रवास हा अभूतपूर्व आणि प्रेरणादायी असा आहे. आयुष्यातला निम्याहून अधिकचा काळ साहित्य आणि कला क्षेत्राला त्यांने देऊ केला आहे  ज्याद्वारे समाजाची सेवा करता आली याचे समाधान त्यांना  आहे.

काव्यसंग्रह

१. गीत भीमायण - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यग्रंथ  वर्ष २००८

२. गीत रमायण - मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यग्रंथ  वर्ष २००८

३. संसार माझा आंबेडकरी - ५० युगसाक्षी भीमगीतांचा काव्यग्रंथ वर्ष २०१७

नाव : लोककवी हरेंद्र हिरामण जाधव ‍- ‍जलसाकार, शाहीर, कवी‌‌
आयुष्य
जन्म : १६ फेब्रुवारी, १९३३
जन्मस्थान : मिग ओझर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, भारत
मृत्यु : २४ एप्रिल २०२१
व्यक्तिगत माहिती
धर्म: बौद्ध धर्म
नागरिकत्व : भारतीय
देश : भारत
भाषा : मराठी  
संगीत आणि कला क्षेत्रातील कारकीर्द
भीमगीत, सामाजिक गीत, लोकगीत, भजन, गझल, कविता, बालगीत, कोळीगीत, अभंग,

गण-गवळण, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य.

पेशा
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
प्रकाशित साहित्य
गाण्यांच्या तबकड्या, कॅसेट (ध्वनीफीत), सीडी, ऑडिओ-सीडी, व्हि-सीडी आणि सध्या सोशल मीडिया.

७५ हुन अधिक कथा - कथा भीमरायाची, कथा गुजरात भूकंपाची, कथा गौतम बुद्धांची, कथा संत कबीराची, शिवरायांची पराक्रम कथा इत्यादी

साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, एडस, दारूबंदी या विषयावरील अनेक सामाजिक प्रबोधनात्मक लोकनाट्य, पोवाडे आणि कार्यक्रम आकाशवाणी व दूरदर्शन प्रसारित झाले आहेत.

सहाशे हुन अधिक ध्वनिफिती लोकार्पित आहेत.

आजवर लिहिलेल्या गीतांची संख्या ही जवळ जवळ दहा हजार इतकी आहे अनेक मान्यवर संगीतकार आणि गायकांनी ती संगीतबद्ध आणि गायली आहेत.

लिहिलेली काही पुस्तके
गीत भीमायन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यग्रंथ

गीत रमायन  - मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यग्रंथ

संसार माझा आंबेडकरी - काव्यग्रंथ