हरीश केंची
हरीश कृष्णहरी केंची हे पुणे शहरात राहणारे एक लेखक आणि पत्रकार आहेत. पूना इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असलेले केंची यांच्याकडे बी.ए. (पत्रकारिता) ही पदवी आहे.
हरिश केंची हे १९८९ ते २००० या काळात ’सामना’ वृत्तपत्राचे स्थानिक संपादक होते. ते काही काळ ’चित्रलेखा’ या साप्ताहिकाचेही [उपसंपादक] होते. इ.स. २००८पासून हरीश केंची हे दैनिक ’पुण्यनगरी’चे संपादक, पुढारीचे संपादक दैनिक सुराज्यचे संपादक म्हणून काम पाहिले. दैनिक संचारमध्ये त्यांचे 'प्रभंजन' हे सदर सुरू आहे. याशिवाय गांवकरी, जनसत्ता या वृत्तपत्रातही सदर चालवले.
ते घुमान येथे भरलेल्या [अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|साहित्य संमेलनाच्या] संयोजन समितीचे सदस्य होते.
पुण्यातील ’पद्मशाळी प्रतिष्ठान’चे ते सल्लागार आहेत. सध्या फायरफ्लाय क्रिएटिव्ह सोल्युशन या जाहिरात संस्थेत सिनियर डायरेक्टर आहेत.
http://harishkenchi.blogspot.in हा त्यांचा ब्लॉग आहे.
कौटुंबिक माहिती
[संपादन]केंची पुण्यात पद्मावतीला राहतात. सुमन केंची या त्यांच्या पत्नी; चित्रकार आणि पुस्तक प्रकाशक मृणाल केंची या त्यांच्या कन्या.
पुस्तके
[संपादन]- कैफियत भाग १ व २ (निवडक लेखांचा संग्रह)
- कृष्णवर्णी (कथासंग्रह)
- नाट्यसंमेलनाध्यक्ष (पहिल्या ७५ नाट्यसंमेलनाध्यक्षांचा त्रोटक परिचय आणि त्यांनी केलेल्या भाषणांचा सारांश)
- पडसाद भाग १ व २ (निवडक लेखांचा संग्रह)
- पाचव्या वर्णासाठी (निवडक वैचारिक लेख)
- महात्मा फुले यांचे अखंड .. (लेखसंग्रह)
- शतकांचे साक्षीदार (जुन्या इमारतींचा परिचय)
- शंभर नंबरी माणसं (व्यक्तिचित्रणे)
पुरस्कार
[संपादन]- ’सलाम पुणे’ या संस्थेने ’पत्रकार दिन सोहळा २०१५’च्या निमित्ताने दिलेला उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार.