हरविंदरसिंग (तिरंदाज)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरविंदरसिंग हा एक भारतीय तिरंदाज आहे. त्याने जकार्ता येथे सुरू असलेल्या पॅराआशियाड क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा चीनच्या झाओ लिश्यूचा ६-०असा पराभव केला.[१][२][३]

त्याने हे सुवर्ण पदक वैयक्तिक रिकर्व्ह ओपन - डब्ल्यू-२-एसटी गटात मिळविले. डब्ल्यू-२ या गटात पक्षाघात अथवा अन्य कारणाने गुडघ्याखालील पाय गमावणाऱ्यांचा समावेश असतो व त्यांना व्हिलचेअरची गरज असते.

एसटी गटातील तिरंदाजामध्ये मर्यादित दिव्यांगत्व असते.ते व्हिलचेअरविना लक्ष्यभेद करू शकतात.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ इंडिया टूडे चे संकेतस्थळ
  2. ^ फर्स्टपोस्ट.कॉम हे संकेतस्थळ
  3. ^ "आशियन पॅराऑलिंपिकचे संकेतस्थळ". Archived from the original on 2018-10-12. 2018-10-13 रोजी पाहिले.
  4. ^ पॅराऑलिंपिक.ऑर्ग हे संकेतस्थळ