हनुमानगढी
Appearance
(हनुमानगढ़ी या पानावरून पुनर्निर्देशित)
Hindu Temple in Uttar Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मंदिर | ||
---|---|---|---|
स्थान | अयोध्या, अयोध्या जिल्हा, Ayodhya division, उत्तर प्रदेश, भारत | ||
| |||
हनुमानगढ़ी मंदिर हे अयोध्येतील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आणि या मंदिरात अंजनीपुत्र भगवान हनुमानजींची पूजा केली जाते. हे मंदिर अयोध्या शहरातील एका पर्वतावर आहे, ज्याला हनुमानगढी म्हणून ओळखले जाते. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सुमारे ७६ पायऱ्या चढाव्या लागतात. प्राचीन कथांनुसार, असे सांगितले जाते की भगवान हनुमान अयोध्येच्या रक्षणासाठी येथे वास्तव्य करत होते. त्यामुळे लाखो भाविक हनुमानजींच्या दर्शनासाठी येथे येतात. हनुमानगढ़ी मंदिर 8 व्या ते 10 व्या शतकात बांधले गेले आहे. येथे येथे हनुमान जयंती, दीपावली आणि रामनवमी सारखे सण येथे मोठ्या थाटामाटात आयोजित केले जातात. मंदिरात हनुमानजींची चार फुटी सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे. मूर्तीची स्थापना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, जणू काही हनुमानजी गुहेत बसले आहेत.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "10 Best Places to Visit in Ayodhya in 2 Day" (इंग्रजी भाषेत). 2024-11-19. 2024-11-19 रोजी पाहिले.