Jump to content

हडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समजानुसार, स्त्री-भुताचा एक प्रकार. असाही समज आहे की या प्रकारातले भूत पांढरी वस्त्रे घालून तरुणांना आकर्षित करते व त्यांना बाधते. हे भूत स्त्रीचे सुंदर रूप धारण करते.[ संदर्भ हवा ]

स्त्री पिशाच्च प्रकारामध्ये हडळ हे नाव जरी घेतले तरी एक अशी जरब असते की नुसत्या उच्चारानेही कापरे भरते. हडळीचे दर्शन होते ते अनेकदा सांगाडयाच्या रूपात. प्रयोगशाळेत मानवी सांगाडा असतो त्याला नुसते हिरवे किंवा पांढरे लुगडे गुंडाळले की जसे ते दिसेल तसे हा प्रकार दिसतो. हा प्रकार बऱ्याच जणांना दिसतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

एखादी पडकी विहीर किंवा पडका वाडा यात हिचे वास्तव्य असते. बांगड्यांचा आवाज, बाळ रडण्याचा आवाज येणे असे प्रकार इथे दिसतात. बऱ्याच वेळा केस जळल्याचा वास येतो. हा प्रकार इतका भयानक आहे की मी मी म्हणणाऱ्यांची पंचाईत होते. धिटात धीट असणाऱ्याची पाचावर धारण बसते. सर्वसाधारण बाळंतपणात मृत्यू झालेल्या स्त्रीचा हा प्रकार असतो. याचे स्वरूप इतके तीव्र असते की हा प्रकार वारंवार दिसतो याची त्या भागातील लोकांना जाणीव होते.

हडळीचा त्रास झाल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेतच. हडळीचा वास जिथे आहे त्या घरात सुखसमाधान लाभत नाही त्या ठिकाणी विचित्र प्रकार घडत असतात. हडळीचे दर्शन झाल्यावर आपण नग्न आहोत असे वाटू लागते. या कल्पनेतून मग स्वतःभोवती हिरवे वस्त्र घेण्याचा प्रकार सुरू होतो या सततच्या प्रकारामुळे या वस्त्राचा रंग इतका दाट होतो की तो स्पष्ट दिसतो. करडा किंवा हिरवा रंग हा कुवासनांचा रंग असतो म्हणून हडळीच्या प्रकारात बाधित व्यक्तीने हिरव्या रंगाचे पातळ घातले आहे असा भास होतो.