Jump to content

स्वेरकर योहानसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वेरकर योहानसन (२६ मे, इ.स. १९६१:लुंड, स्वीडन - ) हे एक स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आहेत.

जोहानसन यांच्याकडे अभियांत्रिकी आणि भाषाशास्त्राची पदवी आहे . 

स्वेरकर हे त्यांच्या स्वीडिश आणि सेबुएनो विकिपीडियातील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी निर्माण केलेल्या एलएसजे बॉट ह्या सांगकाम्याने जवळपास सत्तावीस लाख नोंदी विकिपीडियावर लिहल्या आहेत.

एलएसजे बॉट एकेदिवशी जवळपास १०,००० नोंदी  लिहू शकतो [] , स्वेरकरचे बहुतांश लिखाण  जगातील वन्यजीव प्राण्यांवर आहे. एकूण लिखाणातील  १/३ लिखाण स्वीडिश  भाषेत आहे  आणि २/३ सेबुएनो आणि  इतर फिलिपिनी भाषेत  आहे .  [] []

त्यांच्या ह्या सांगकाम्यामुळे वीस लाख लोक बोलणाऱ्या सेबुएनो भाषेचा विकिपीडियातील लेखांच्या संख्येमध्ये इंग्लिश खालोखाल दुसरा क्रमांक तर स्वीडिश भाषेचा तिसरा क्रमांक आहे.[]

  1. ^ "संग्रहित प्रत". 2017-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-01 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.huffingtonpost.co.uk/2014/07/15/sverker-johansson-wikiped_n_5587008.html
  3. ^ http://www.smh.com.au/technology/technology-news/this-is-how-sverker-johansson-wrote-85-per-cent-of-everything-published-on-wikipedia-20140715-ztbao.html
  4. ^ https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias