स्वाती चांदोरकर
Appearance
स्वाती चांदोरकर या एक मराठी लेखिका आहेत. त्या लेखक व.पु. काळे यांच्या कन्या आहेत. त्या B.Sc. (Home Science) असून संगीत, नृत्य, रेकी, पेंटिंग, नाट्याभिनय यांमध्ये प्रवीण आहेत. वपु – एक अमृतानुभव या कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या आहेत.
पुस्तके
[संपादन]- अनाहत
- आणि विक्रमादित्य हरला (कथासंग्रह)
- उत्खनन
- एक पायरी वर (कादंबरी)
- काळाकभिन्न (कथा)
- गोल गोल राणी (कथासंग्रह)
- नानक - निरंकारी कवी (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- नानक - परमात्म्याचा नाद ओम्कार (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- नानक - संसारी संन्यस्त (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- नानक - सूर संगीत ए्क धून (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- पवित्रम् (या कादंबरीचे प्रकाशन अंधेरी (मुंबई)तील अंधेरी-सहार रोड येथील 'मुक्तिधाम' या स्मशानात झाले)
- फॉरवर्ड अँड डिलिट (कादंबरी)
- मीरा एक वसंत आहे (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- मीरा श्यामरंगी रंगली (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- मीरेची मधुशाला (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- मीरेच्या प्रेमतीर्थावर (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- मृत्यायुषी (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- मृत्यूचे अमरत्व (अनुवाद. मूळ लेखक - ओशो)
- युथनेशिया (कथा)
- वपु (शब्दचित्रण)
- शेष (कादंबरी)
- सेलिब्रेशन (कथासंग्रह)