स्वप्ना बर्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वप्ना बर्मन

स्वप्ना बर्मन (जन्म २९ ऑक्टोबर १९९६) एक भारतीय हेप्टॅथलीट आहे. वयाच्या २१व्या वर्षी स्वप्ना २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्ना सात ट्रॅक आणि फील्ड प्रकारांमध्ये हेप्टॅथलॉनचं सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. ऑगस्ट २०१९ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. [1]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

स्वप्नाचा जन्म १९९६ मध्ये पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळच्या घोसपाडा गावात एका गरीब राजबोंगशी कुटुंबात झाला. तिची आई गृहिणी होती तर वडील रिक्षाचालक. त्यांच्याकडे त्यांच्या मुलीचे अ‍ॅथलेटिक्सचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची साधने नव्हती, परंतु त्यांनी जे काही शक्य होते ते केले.

तिचे वडील तिला जवळच्या एका मैदानावर सोडत असत. त्यांनीच आपल्याला खेळायला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. [3] [2]

आणखी एक आव्हान होते. स्वप्नाला जन्मापासूनच प्रत्येक पायावर सहा बोटे होते. आयुष्यभर ती आपले सहा बोटांचे पाय पाच बोटांसाठीच्या जोडयामध्ये घालुन वावरत होती. पण हेप्टॅथलॉनमध्ये म्हटलं की तुमच्या सहनशक्तीची आणि तुमच्या क्षमतेची परीक्षाच घेणारा क्रीडाप्रकार. यात ट्रॅक आणि फील्डवरचे सात खेळ असतात, ज्यामध्ये धावणे, उड्या मारणे, झेप घेणे, फेकणे या सर्व क्रियांमध्ये कुठलीही तडजोड किंवा कमतरता राहता कामा नये.

या बहुदिवसीय स्पर्धेत स्वप्नाला तिच्या सहा बोटांमुळे खूप त्रास होत होता. प्रत्येक उडी घेतल्यानंतर तिला खूप दुखायचे, आणि स्प्रिंट अर्थात जलद धावण्यातही तिची कामगिरी फार आशादायी नव्हती.तरीही तिने आपल्या प्रयत्नानी या समस्येवर मात केली.

ट्रॅक आणि फील्ड क्रीडाप्रकारांमध्ये हा सर्वांत कठीण खेळ मानला जातो, आणि या स्पर्धेत खेळताना स्वप्नाला असह्य असे दाताचे दुखणे सुरू होते. या वेदना कमी करण्यासाठी स्वप्ना जबडा आण हनवुटीवर मोठी पट्टी बांधून स्टेडियममध्ये हजर झाली होती. [2]

२०१२ मध्ये ती उत्तम प्रशिक्षण घेण्यासाठी कोलकाता येथे आली. तिचे कोच सुभाष सरकार कोलकातामधील सॉल्ट लेक सिटी स्थित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षक होते. २०१३ मध्ये त्यांनी स्वप्नाला एसएआयच्या वसतिगृहात आणले.

२०१३ मध्ये, सरकार यांनी स्वप्नाला गुंटूर येथे युथ हेप्टॅथलॉन स्पर्धेसाठी पाठवले. तिने ४,४३५ गुणांची नोंद करत रौप्य पदक जिंकले. तिथूनच तिची हेप्टॅथलॉन कारकिर्दीला सुरुवात झाली. आता अनेक बूट कंपन्यांनीं तिच्यासाठी अनुकूल असे शूज बनवून देण्याच्या ऑफर्स तिला देऊ केल्या आहेत. [4]

हेप्टॅथ्लॉन खेळ[संपादन]

हेप्टॅथ्लॉन(इंग्रजी शब्द-हेप्टॅ म्हणजे सात) म्हणजे सात खेळांचा समावेश असलेला एक खेळ आहे. यात १०० मीटर्स धावणे,२०० मीटर्स धावणे,८०० मीटर्स धावणे, उंच उडी,लांब उडी,गोळाफेक व भालाफेक या सात क्रिडाप्रकारांचा समावेश असतो.

व्यावसायिक यश

२०१४ चे आशियाई गेम्स स्वप्नाची वरिष्ठ गटातील पहिली स्पर्धा होती.

२०१७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने ५,९४२ गुणांसह सुवर्ण पदक जिंकले. त्याच वर्षी तिने पतियाळा फेडरेशन कपमध्ये ५,८९७ गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. २०१९ मध्ये याच स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले.

२०१८ च्या आशियाई गेम्समध्ये तिने हेप्टॅथलॉनमधील सुवर्ण पदक जिंकत जेतेपद पटकावले.

    ऑगस्ट २०१९मध्ये तिला खेळातील उल्लेखनीय कामगरीबद्दल मानाच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. [1] [4]

वैयक्तिक माहिती

जन्मः २९ ऑक्टोबर १९९६

घोषपाडा, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल, भारत

कारकीर्द

राष्ट्र: भारत

खेळ: अथलेटिक्स

प्रकार : हेप्टॅथलॉन

जेतेपदे आण वैयक्तिक सर्वश्रेष्ठ कामगिरी: ६,०२६ गुण (जकार्ता २०१८)

पदक तालिका

भारताचे प्रतिनिधित्व करताना:

२०१८ च्या जकार्ता येथील आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक

२०१७ मध्ये भुवनेश्वर येथील आशियाई चॅम्पियनशिप्समध्ये सुवर्ण पदक

२०१९ मध्ये दोहा येथील आशियाई चॅम्पियनशिप्समध्ये रौप्य पदक

२०१७ नवी दिल्लीत झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत रौप्य पदक

संदर्भ

Swapna Barman- Wikipedia [1]

Asian Games: India athletes break barriers to make sports history [2]

BBC EXCLUSIVE: गोल्ड जीतने की ख़ुशी के बीच छलकी स्वप्ना की पीड़ा [3]

The unlikely rise of Swapna Barman: From wrong body type to Asia’s finest athlete [4]