Jump to content

स्प्रिंगफील्ड (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्प्रिंगफील्ड, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
स्प्रिंगफील्डचे नगरगृह

स्प्रिंगफील्ड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर बाका काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे. [] २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५१ होती. []

इतिहास

[संपादन]

या शहराचे नाव स्प्रिंगफील्ड, मिसूरीवरून ठेवण्यात आले आहे. []

भूगोल

[संपादन]

यूएस महामार्ग २८७ आणि ३८५ स्प्रिंगफील्डमधून जातात. स्प्रिंगफीलड लमारपासून ७६ किमी (४७ मैल) दक्षिणेस तर बॉइझी सिटी ओक्लाहोमाच्या उत्तरेस ७९ किमी (४९ मैल) आहे. यूएस महामार्ग १६९ शहराच्या अगदी दक्षिणेचा सीमेवरून पश्चिमेला १९० किमी (१२० मैल) त्रिनिदाद, कॉलोराडो आणि पूर्वेस ८० किमी (५० मैल) जॉन्सन सिटी, कॅन्सस पर्यंत जातो.

स्प्रिंगफील्ड म्युनिसिपल विमानतळ (FAA ID: 8V7) शहराच्या उत्तरेस चार मैलांवर आहे. []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): Springfield town, Colorado". U.S. Census Bureau, American Factfinder. February 12, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 26, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Dawson, John Frank. Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 47.
  4. ^ "Springfield Municipal Airport". AirNav.com. December 16, 2020 रोजी पाहिले.