स्थानपोथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थानपोथी हा मराठीतील पहिला भूगोल ग्रंथ असण्याची शक्यता आहे.

नागदेवाचार्य यांच्या सांगण्यावरून बाईदेवव्यासांनी स्थानांचे पहिले टीपण केले. दुसरे टीपण कुमर आम्नायातील मुनिव्यास कोठी यांनी शके १२७५ मध्ये केले आणि तिसरे टीपण महंत चिरडे यांनी १५ व्या शतकात केले अशा तीन टप्प्यात हा ग्रंथ परिष्कृत झाला. प्रत्येक वेळी प्रत्येक स्थानपोथीकर्त्याने प्रत्येक स्थानाची आधी ‘शोधनी’ केली, म्हणजेच संशोधन केले, आणि मगच आपले टिपण सिद्ध केले. या ग्रंथात महाराष्ट्रातील सुमारे १९७ गावांची नोंद आढळते. डॉ. वि. भि. कोलते यांनी स्थानपोथीचे संपादन केले आहे. त्यात प्रस्तावनेत कोलते म्हणतात, ‘अमरावती, अकोला, बुलढाणा, हे वऱ्हाडातील तीन जिल्हे, नागपूर व भंडारा जिल्हा, हैद्राबाद संस्थानातील वरंगळ जिल्हा (व तिकडे जाताना अर्थातच चांदा जिल्हा); आदिलाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड वगैरे मराठवाड्यातील जिल्हे, पूर्व खानदेश, पश्चिम खानदेश, नाशिक, अहमदनगर हे मुंबई इलाख्यातील जिल्हे, हे सर्व विभाग मिळून होणारा म्हणजे जवळ जवळ सर्व महाराष्ट्र हा त्यांचा परिभ्रमणाचा प्रदेश होता.’६) स्थानपोथी - संपा. डॉ. वि. भि. कोलते, अरुण प्रकाशन, मलकापूर, आ. २ री,१९७६.