Jump to content

स्टॅन विन्स्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॅन विन्स्टन
जन्म स्टॅन्ली विन्स्टन
७ एप्रिल १९४६ (1946-04-07)
मृत्यू १५ जून, २००८ (वय ६२)
चिरविश्रांतिस्थान हिल्ससाइड मेमोरियल पार्क कब्रिस्तान
कारकिर्दीचा काळ १९७२ - २००८
जोडीदार कॅरेन विन्स्टन (१९६९ - २००८; त्याचा मृत्यू; २ मुले)


स्टॅनली "स्टॅन" विन्स्टन [१] (७ एप्रिल १९४६ - १५ जून २००८) हे एक अमेरिकन दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये मेक-अप द्वारे विशेष प्रभाव निर्माण करणारे कलाकार होते. टर्मिनेटर मालिका, पहिले तीन जुरासिक पार्क चित्रपट, एलियन्स, पहिले दोन प्रिडेटर चित्रपट, इंस्पेक्टर गॅझेट, आयरन मॅन सारख्यामध्ये चित्रपटांमध्ये केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी ते ओळखले जात होते. [२][३][४] त्यांना त्यांच्या कामासाठी चार वेळा ॲकॅडमी पुरस्कार बहाल करण्यात आला. स्टॅन हे "विंस्टन डिजिटल" सह अनेक स्पेशल इफेक्ट स्टुडिओचे मालक होते. विन्स्टन मेकअप, कठपुतळे आणि व्यावहारिक प्रभावांमध्ये निपुण होते. त्याने नुकतेच डिजिटल क्शेत्रात पदार्पण करण्यासाठी स्टुडिओ वाढवला होता.

प्रारंभिक जीवन[संपादन]

विन्स्टनचा जन्म ७ एप्रिल १९४६ रोजी अरलिंगटन, व्हर्जिनिया येथे एका यहूदी कुटुंबात झाला.[५] १९६४ मध्ये त्यांनी वॉशिंग्टन-ली हायस्कूलमधून पदवी घेतली. त्याने चार्लोट्सविले, व्हर्जिनिया मधील व्हर्जिनिया विद्यापीठ मध्ये चित्रकला आणि शिल्पकलांचा अभ्यास केला, तिथूनच १९६८ मध्ये त्याने पदवी घेतली.[४]

कारकीर्द[संपादन]

१९६९ मध्ये कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, लॉन्ग बीच येथील अभ्यास झाल्यानंतर, विन्स्टन अभिनेता बनण्यासाथी हॉलीवूडला गेला. अभिनयाची नोकरी शोधत असताना त्याने वॉल्ट डिस्ने पिक्चर्स / स्टुडिओज मध्ये मेकअप अपेंटिसशिप सुरू केली.[४]

१९७० चे दशक[संपादन]

१९७२ मध्ये विन्स्टनने स्वतःची कंपनी, स्टॅन विंस्टन स्टुडिओची स्थापन केली. टेलिफिल्म गार्गॉयल्स (चित्रपट) मधील त्याच्या प्रभावांसाठी एम्मी पुरस्कार जिंकला. पुढील सलग सात वर्षांत, विन्स्टनला त्याच्या प्रकल्पांवरील कामांसाठी एम्मी पुरस्काराचे नामांकन मिळाले. १९७४ च्या द ऑटोबायोग्राफी ऑफ मिस जेन पिटमॅन साठी एम्मी पुरस्कार जिंकला. विन्स्टनने १९७८ च्या स्टार वॉर्स हॉलिडे स्पेशलसाठी वूकी पोशाख तयार केला होता. १९७८ मध्ये विन्स्टन विझ (चित्रपट) साठी स्पेशल मेक-अप डिझाइनर होता.[ संदर्भ हवा ]

१९८० चे दशक[संपादन]

१९८२ मध्ये विन्स्टनला हार्टबीप्स साठी पहिले ऑस्कर नामांकन मिळाले. त्यावेळेस त्यांनी स्वतःचा स्टुडिओ सुरू केला होता. रॉब बोटीन याच्या वैज्ञानिक-भयपट द थिंग (१९८२ चित्रपट)च्या कामाने त्याला हॉलीवूडमध्ये खूप नाव मिळवून दिले. त्याने फ्रायडे द थर्टीन भाग तिसरा मधील काही दृक् प्रभावांमध्ये जेसनचे वेगळे शिल्प तयार केले होते.

१९८३ मध्ये विन्स्टनने मिस्टर रोबोटो या अमेरिकन रॉक ग्रुपसाठी फेसमास्क बनवले. [६]

१९८३ मध्ये त्यांनी अल्पकालीन टेलिव्हिजन मालिका मनीमल मध्ये देखील काम केले, ज्यासाठी त्यांनी पॅन्थर आणि हॉक ट्रान्सफॉर्मेशनचे इफेक्ट्स तयार केले.

१९८४ मध्ये जेम्स कॅमेरॉनच्या 'द टर्मिनेटर' या चित्रपटातील कामामुळे विन्स्टनला एका वेगळ्याच स्तरावर पोहोचवले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Stan Winston Biography (1946?-)". Filmreference.com. 1946-04-07. 2011-07-20 रोजी पाहिले.
  2. ^ Cohen, David S. (2008). "Effects master Stan Winston dies. Work included Jurassic Park, Terminator", Variety webpage retrieved 2008-06-16.
  3. ^ Crabtree, Sheigh (2008). "Stan Winston, dead at 62; Oscar-winning visual effects artist suffered from multiple myeloma", Los Angeles Times, Entertainment industry news blog, June 16, 2008; online version retrieved 2008-06-16.
  4. ^ a b c Stan Winston Studio (2008). "Press Release" posted at Los Angeles Times Entertainment industry news blog, June 16, 2008; online version retrieved 2008-06-16.
  5. ^ "Memories of a Monster Maker - ComingSoon.net". ComingSoon.net (इंग्रजी भाषेत). 2008-06-20. 2018-11-18 रोजी पाहिले.
  6. ^ "Center For Roboto Research And Preservation" Archived 2010-01-24 at the Wayback Machine., webpage retrieved 2008-06-16.