स्टीव डॉड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्टीव डॉड
Steve Dodd in Korea.jpg
जन्म १ जून, १९२८ (1928-06-01)
ॲलिस स्प्रिंग्स, नॉर्दर्न टेरिटोरी
पेशा नट, पशुपाल
कारकिर्दीचा काळ १९४६–सद्य


स्टीव डॉड (जन्म: १ जून १९२८), हा मूलवासी ऑस्ट्रेलियन (Indigenous Australian)[मराठी शब्द सुचवा] नट आहे. तो सात दशकांपासून ऑस्ट्रेलियन मूलवासी लोकांच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मूळचा पशुपाल व रोडियो पटू (बैल किंवा घोड्याच्या पाठीवर बसून खेळला जाणारा एक खेळ) असणाऱ्या स्टीवला प्रख्यात ऑस्ट्रेलियन अभिनेता चिप्स राफर्टी याने प्रथम चित्रपटांत संधी दिली. कोरिया युद्धादरम्यान ऑस्ट्रेलियन लष्करात असतांना त्याचे चित्रपटांमधील काम सहा वर्षांसाठी खंडित झाले होते. तसेच वंशभेदामुळे व सतत एकाच प्रकारच्या भूमिका मिळाल्यामुळे त्याची कारकीर्द काहीशी मर्यादितच राहिली.

त्याने अनेक प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. यामध्ये गॅलिपोलीद चँट ऑफ जिम्मी ब्लॅकस्मिथ (या चित्रपटात त्याने प्रमुख पात्राच्या खूनी काकांची भूमिका बजावली होती.) या चित्रपटांचा समावेश होतो. द कोका-कोला किड, क्विगली डाऊन अंडर आणि द मॅट्रिक्स यासारख्या ऑस्ट्रेलियात निर्मित आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधूनही त्याने लहान भूमिका केल्या आहेत. होमिसाइड आणि रश यासारख्या जुन्या ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तसेच नजिकच्या काळातील द फ्लाइंग डॉक्टर्स या मालिकांमध्ये त्याची भूमिका होती.