स्टँडर्ड ऑइल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टँडर्ड ऑइल ही अमेरिकेतील खनिज तेलाचे उत्पादन, वहन, शुद्धीकरण आणि विक्री करणारी मोठी कंपनी होती. हीची स्थापना १८७०मध्ये जॉन डी. रॉकफेलरने ओहायोमध्ये केली. ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी खनिज तेल शुद्धीकरण कंपनी होती आणि जगातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांमधील एक होती.

सुरुवातीच्या काळात स्टँडर्ड ऑइलने तेलाचे उत्पादन आणि हाताळण्याच्या प्रक्रियेत अनेक शोध लावून उत्पादनखर्च कमी केला व त्याद्वारे इतर तेलकंपन्याशी स्पर्धा करून त्यांच्यावर वर्चस्व मिळविले. नंतरच्या काळात स्टँडर्ड ऑइलने आपल्या संपत्ती व बाजारातील पतीचा दुरुपयोग करून अनेक स्पर्धकांना अडचणीत आणून त्यांचा व्यवसाय बंद पाडला. ही कंपनी अमेरिकेतील खनिज तेल बाजारावर एकाधिकार गाजवत असल्याचे पाहून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने १८११मध्ये या कंपनीचे विभाजन केले.