स्क्रीनिंग कल्चर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्क्रीनिंग कल्चर: वीव्हिंग पोलिटिक्स एथनोग्राफी ऑफ टेलिव्हिजन वुमनहूड अँड नेशन इन पोस्टकलोनियल इंडिया हे पुस्तक १९९९ साली प्रसिद्ध झाले. टीव्ही बघण्याच्या सवयींबाबतचा लोकलेखा पद्धतीचा उपयोग करून केलेला अभ्यास आहे. या अभ्यासात प्रगत होत जाणाऱ्या मध्यमवर्गीय स्त्रिया आणि त्यांचे शासनाचे प्रायोजित केलेल्या मालिकांमधील भावसंबंध याविषयी लिहिले आहे.

लेखिकेविषयी[संपादन]

या पुस्तिकेच्या लेखिका पूर्णिमा मानकेकर या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृती आणि मानववंशशास्र या विषयाचा सहायक अध्यापिका होत्या. सध्या त्या युसीएलए येथे जेंडर स्टडीज आणि एशियन अमेरिकन स्टडीज या विषयाच्या प्राध्यापक आहेत.[१] मे २०१५ मध्ये त्यांचे अनसेटलिंग इंडिया हे पुस्तक प्रसिद्ध झाले असून या पुस्तकात भारतीयत्वाचे नवे पैलू विषद केले आहे. या पैलूंच्या आधारे ज्ञाननिर्मिती त्याचे माध्यम अंतर हे वेगवेगळ्या नागरी संस्कृतीमध्ये कसे घडते याचा अभ्यास करता येतो.

महत्वाच्या संकल्पना[संपादन]

सरकारी दुरचित्रवाणीवरील कर्यक्रम सादरीकरणाची संस्कृती हि प्रेक्षकंच्या कथनातुन स्पष्ट होते. टीव्हीवरील कार्यक्रमातुन स्त्री आणि पुरुषांचे लिंगभावात्मक विषयांचे कसे परावर्तीत होते हे यातुन लक्षात येते. ज्या विशिष्ट काळात हा अभ्यास झाला आहे त्या काळाचा संदर्भ लक्षात घेता त्या काळात प्रेक्षकांचे राष्ट्रीय घटकात कसे रुपांतर झाले हेही पाहता येते. या दृकश्राव्यकथनामध्ये सामान्य माणसांच्या दैनदिन कथा असतात. अशा प्रकारच्या राष्ट्रीय प्रयत्नातून एक प्रकारचे एकसुरी व्यक्तित्व घडविण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्यामुळे स्त्री आणि पुरुषांची वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वे उभी राहण्यास नकार दिला जातो. अशा तऱ्हेने या संस्कृती वर्णनात्मक लेखनातुन मानकेकर यांनी दूरचित्रवाणीवरील दृकश्राव्य कथनातून आणि त्यातून उभ्या केलेल्या भारतीय स्त्रीत्वातून स्त्री आणि पुरुषांचे विविध पैलू असलेली व्यक्तिमत्वे उभे राहतात.

हे पुस्तक तीन भाग आणि एक उपसंहार अशा चार भागात आहे. यातील प्रत्येक भाग दूरदर्शन कथनातून तयार झालेल्या चर्चाविश्वाचे शब्दांकन करतो. पहिल्या भागात दूरदर्शनने कुटुंबाची कशी पुर्नरचना केली आहे हे दाखवते. दुसऱ्या भागात दुरदर्शनने समुह कसे लिंगभावरहित केले आहेत हे सांगतो. पुस्तकाच्या तिसऱ्या भागात हिंसाचाराच्या दृकश्राव्य कथनांचे विश्लेषण केले आहे. आणि शेवटी उपसंहारात दूरचित्रवाणीने कशा प्रकारे भारतीय राष्ट्रीयत्व रचण्यामध्ये सहभाग दिलाय तसेच हेच व्यक्तिमत्व सीमेचे बंधन नसलेल्या भांडवल आणि आकांक्षाभोवती कसे रचले आहे हे सांगितले आहे.

संदर्भ[संपादन]