स्कायबस सुपर शटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्कायबस या पानावरून पुनर्निर्देशित)
स्कायबस

स्कायबस सुपर शटल (Skybus Super Shuttle) ही ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक बस सेवा आहे. स्कायबस मेलबर्न विमानतळाला मेलबर्न शहरासोबत जोडते. स्कायबस सेवेद्वारे शहरातील सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून मेलबर्न विमानतळावर पोहोचता येते. परतीसही हीच सेवा उपलब्ध आहे. प्रवाश्यांकडे असलेले जादा सामान ठेवण्याची सुवीधा असलेल्या बसेस या सेवे साठी वापरल्या जातात.

जून १९७८ पासून चालू असलेल्या स्कायबसच्या ताफ्यामध्ये ४९ बसेस आहेत. दरवर्षी सुमारे २० लाख प्रवासी ह्या सेवेचा वापर करतात.

बाह्य दुवे[संपादन]