Jump to content

सौर सेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एक पारंपरिक क्रिस्टलाइन सिलिकॉन पासून बनवलेला सौर सेल (२००५ च्या बनावटीचे)
फोटोव्होल्टेइक सेलचे प्रतीक

सौर सेल किंवा फोटोव्होल्टेइक सेल हे एक विद्युतीय उपकरण आहे जे प्रकाशीय उर्जेचे थेट वीजेत रूपांतर करतो. यासाठी फोटोव्होल्टेइक प्रभावाचा वापर केला जातो. ही एक भौतिक आणि रासायनिक घटना आहे. [१]. हे फोटोलेक्ट्रिक सेलचा एक प्रकार आहे. हे उपकरण प्रकाशात ठेवल्यानंतर याची विद्युतीय वैशिष्ट्ये, जसे कि विद्युत्, व्होल्टेज किंवा प्रतिरोध बदलत जातात. एक एक सौर सेल उपकरणांना जोडून मॉड्यूल तयार केले जाऊ शकते, सहसा अशा उपकरणांना सौर पॅनेल म्हणून ओळखले जाते. एक सिंगल जंक्शन सिलिकॉन सौर सेल सुमारे ०.५ ते ०.६ व्होल्टेज तयार करू शकते. [२]

सोलर सेलस् हे फोटोव्होल्टेइक आहेत त्यामुळे ते सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश आहे की नाही याची पर्वा न करता काम् करतात. ते फोटोडीटेक्टर म्हणून वापरले जातात (उदाहरणार्थ इन्फ्रारेड डिटेक्टर). यांचा वापर जवळचा दृश्यमान प्रकाश किंवा इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे ओळखण्यासाठी सुद्धा करतात. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी याचा वापर करतात.

फोटोव्होल्टेइक (पीव्ही) सेलचे काम चालण्यासाठी तीन मूलभूत गुणधर्मांची आवश्यकता असते:

  1. प्रकाशाचे शोषण करण्यास सक्षम असणे, म्हणजेच एकतर इलेक्ट्रॉन-होल जोड किंवा एक्झिटन्स तयार करणे.
  2. विरुदध प्रकारच्या वाहक वेगळे वेगळे करता येणे
  3. तयार झालेले वाहक बाहेर जाण्यासाठीचे वेगळे मार्ग.

प्रथम फोटोव्होल्टेईकचा प्रभाव फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ एडमंड बेकरेल यांनी प्रायोगिकरित्या प्रदर्शित केला. 1839 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रयोगशाळेत जगातील पहिला फोटोव्होल्टिक सेल बनविला.सौर सेलचे कार्य पुढीलप्रमाणे:

  1. सूर्यप्रकाशामधील फोटॉन सौर पॅनेलला धडकतात आणि सिलिकॉन सारख्या अर्धसंवाहक सामग्रीद्वारे ते शोषले जातात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Solar Cells. chemistryexplained.com
  2. ^ "Solar cells -- performance and use". solarbotics.net.