सौंदर्यप्रसाधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सौंदर्य वाढविण्यासाठी असलेल्या प्रसाधनांना सौंदर्यप्रसाधन असे म्हणतात. याचा हेतू सौंदर्यवान व आकर्षक दिसणे असा असतो. सर्वसाधारण पणे स्त्रिया सौंदर्यप्रसाधन करतात व त्यासाठी आवश्यक साधने वापरतात. काही पुरुषही सौंदर्यप्रसाधन करतात.

सौंदर्यप्रसाधनांचा वापर हा भारतात व जगातील अनेक देशांत फार पूर्वीच्या काळापासून सुरू आहे. तेव्हा राजघराण्यातील स्त्रिया या सौंदर्यप्रसाधनासाठी विविध आयुर्वेदिक उटणे, हळद आदी गोष्टींचा वापर करीत असत. अनेक सौंदर्यालंकार वापरीत असत. सध्या अनेक स्त्रिया ह्या आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार सौंदर्यप्रसाधन करतात. फेसपावडर हा अश्या साधनांतील एक सामान्य प्रकार आहे. आजच्या काळात विषयुक्त रसायनांचा या सौंदर्य प्रसाधनांमधे अति वापर झाल्यामुळे कर्करोग, वंध्यत्व,अशा घातक रोगाना सामोरे जावे लागते आहे. तसेच यामधील घातक रसायनिंची माहिती सामान्याना नाहीये.