सोलापूर जिल्ह्यातील अष्टविनायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी शहरांच्या विविध भागात जशी ६८ लिंगांची स्थापना केली, तशीच शहराच्या अष्ट दिशांना काळभैरव आणि अष्टविनायकही स्थापिलेले आहेत. शहरातील विविध भक्त मंडळ महिन्यातील प्रत्येक संकष्टी मंगळवारी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला पदयात्रा काढतात.[ संदर्भ हवा ]

वीरेश तथा वीर गणपती[संपादन]

अक्कलकोट रस्त्यावर आहे. चतुर्थीला गर्दी असते मूर्ती छोटी असून उद्योगपती मोगालाप्पा पोगुल यांनी नव्या मंदिराचा जीर्नोद्वार केला आहे.

बेनक गणपती[संपादन]

आग्नेय दिशेला जुन्या होटगी-कुंभारी रोडवर एका शिवाराच्या बांधावर बेनक गणपती आहे. बेनक म्हणजे पाठीराखा होय. छोट्याश्या गाभाऱ्यात असणाऱ्या मूर्तीचे दर्शन लोटांगण घालून घ्यावे लागते.

धुळी महांकाळ गणपती[संपादन]

दक्षिण दिशेला धर्मवीर संभाजी तलावाच्या समोर श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात धुळी महांकाळ गणपती आहे. सिद्धेश्वराचे खरे नाव धुळी महांकाळ आहे.

करी गणपती[संपादन]

हा गणपती शहराच्या नैरुत्य दिशेला म्हणजे देगाव गावच्या समोर असलेल्या कारीमसाब मुल्ला यांच्या शेतात असणारा हा  गणपती. मूर्ती चार फूट उंच असून कन्नडमध्ये कारीगन म्हणजे काळे डोळे असणारा हा गणेश होय.

वीरकर गणपती[संपादन]

सम्राट चौक परिसरात देशमुख मळ्यात असणारा हा वीरकर गणपती होय. पश्चिम दिशेला असणाऱ्या या गणपतीचे वैशिट्य म्हणजे रेखीव चार फूट उंचीची अशी ही मूर्ती आहे. वीरकर म्हणजे शूर बाहू असा होतो.

वीर-कोलाहल गणपती[संपादन]

वायव्य दिशेला असणारा सहावा भोगाव येथील वीर- कोलाहल गणपती , अष्टविनायक प्रकारातील ही मूर्ती आहे.

मश्रूम गणपती[संपादन]

ईशान्य दिशेला असणारा सातवा गणपती तळेहिप्परगयाचा मश्रूम गणपती , दही खाणारा गणपती अशी याची ख्याती आहे.

अष्टविनायक कामेश्वर गणपती[संपादन]

अष्टविनायक कामेश्वर गणपती अतिथी गणपती होय. यास शेळगी गणपती असेही म्हणतात. हा शिवानुभव मंगल भवन येथे आहे.

चित्रदालन[संपादन]