सोमेन मित्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोमेन मित्रा (जन्म: डिसेंबर ३१, इ.स. १९४३) हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९७२ ते इ.स. २००६ या काळात सलग ७ वेळा काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगाल विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला. इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये ते पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.