सोनोराचे वाळवंट
Appearance
सोनोराचे वाळवंट (इंग्लिश: Sonoran Desert; स्पॅनिश: Desierto de Sonora) हे उत्तर अमेरिकेमधील एक उष्ण वाळवंट आहे. हे वाळव्ंट अमेरिकेची संयुक्त संस्थाने व मेक्सिकोच्या सीमाक्षेत्रात असून अमेरिकेच्या अॅरिझोना व कॅलिफोर्निया तसेच मेक्सिकोच्या सोनोरा, बाशा कालिफोर्निया व बाशा कालिफोर्निया सुर ह्या राज्यांचे मोठे भाग ह्या वाळवंटात वसले आहेत. सुमारे ३.११ लाख चौरस किमी विस्तार असलेले सोनोराचे वाळवंट उत्तर अमेरिकेमधील सर्वात रुक्ष व उष्ण वाळवंट आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |