सोनुला पक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Gadwall (Anas strepera) female and male
Gadwall
Mareca strepera

सोनुला, गज, गजरो, भळीन बड्डा (इंग्लिश: gadwall) हा एक पक्षी आहे.

सोनुला हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो . त्याच्या पोटाचा रंग पांढरा असतो, शेपटी काळीभोर असते तर पंखावरती पांढरा डाग असतो. याच्या पंखाची काळी किनार उडताना ठळकपणे दिसते.

मादी[संपादन]

हि गडद उदी रंगाची असते . तिच्यावर बदामी रंगाचे ठिपके असतात . तिचे पाय पिवळे असतात . आकाशात उडताना पंखावरील येण्यावरून त्याची ओळख पटते . पंख हलवले नाही तर तो उडताना दिसत नाही.

वितरण[संपादन]

हे पक्षी भारतात हिवाळी पाहुणे असतात. दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत आढळतात. हे सहसा दलदली व सरोवरांमध्ये असतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली