Jump to content

सॉर्बे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॉर्बे (Sorbet) म्हणजे काचेच्या किंवा चिनी मातीच्या वाडग्यामध्ये वाढलेला सुगंधी बर्फाचा गोळा. हे आइसक्रीम नव्हे, तर हा फ्रेंच पारंपरिक जेवणाच्या मध्यात येणारा खाद्यपदार्थ आहे.

‘सॉर्बे’ हा शब्द बहुधा अरब देशातल्या ‘शरबत’वरून आला असावा. इटालियन मार्को पोलोने त्याच्या भ्रमंतीतून तो इटलीमध्ये आणला आणि त्याचा ‘सॉरबेत्तो’ झाला. आजही इटालियन सॉर्बे जगप्रसिद्ध आहेत. इटालियन राजघराण्यातून सॉर्बेचा प्रवास फ्रेंच राजघराण्यात झाला, आणि त्यांच्या मेन्यूत जाऊन बसला.

बहुतेक सॉर्बे फळांच्या रसापासून बनविले जातात. साखरेच्या थंड पाकात फळांचा रस घालून, सोबत जिंजर, तुळस यांसारखे स्वाद घालून ते आइसक्रीम मशीनमधून काढले की सॉर्बे तयार होतो. काही सॉर्बेंमध्ये अंड्याचे पांढरे (बील) आणि साखर फेटून घालतात. सॉर्बेचे गोळे आइसक्रीम कपामध्ये ठेवून वाढतात. आईसक्रीमप्रमाणेच सॉर्बेसुद्धा चमच्याने खाल्ला जातो. सॉर्बे खाल्ल्यावर जीभ स्वच्छ झाल्यासारखी वाटते. तोंड ताजेतवाने होते व पुढे वाढल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी जीभ सज्ज होते.

लिंबूरस, संत्रारस किंवा काही मद्ये वापरून केलेले सॉर्ब विशेष लोकप्रिय आहेत.