सेलिना परवीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेलिना परवीन


सेलिना परवीन (३१ मार्च १९३१ – १४ डिसेंबर १९७१) ह्या एक बांगलादेशी पत्रकार आणि कवी होत्या. [१] स.न. १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत विजय मिळवण्यापूर्वी १४ डिसेंबर रोजी अल-बद्र [२] द्वारे मारल्या गेलेल्या बौद्धिक शहीदांपैकी त्या एक होत्या. हा दिवस नंतर बौद्धिक हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार म्हणून त्या साप्ताहिक बेगम, साप्ताहिक ललना आणि शिलालिपीसाठी काम करत होत्या . [१] १८ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना अजीमपूर स्मशानभूमीत पुरण्यात आले. [३]

बालपण[संपादन]

सेलिनाचा जन्म पूर्वीच्या नोआखली जिल्ह्यातील रामगंज उपजिल्ह्यात झाला होता. [१] [३] तिचे वडील अबीदुर रहमान शिक्षक होते. जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर तिच्या वडिलांचे फेणी जिल्ह्यात घर जप्त करण्यात आले, तेव्हा कुटुंबाला परत गावात स्थायिक व्हावे लागले. तेव्हा १२ वर्षांची सेलिना सहावीत शिकणारी आणि कविता व कथा लिहिण्यात कुशल होती. पारंपारिक पुराणमतवादी ग्रामीण संदर्भामुळे तिला तिचे शालेय शिक्षण बंद करावे लागले. वयाच्या १४ व्या वर्षी तिचा बालविवाह तिच्या संमतीविरूद्ध झाला. तिने आपल्या पतीसोबत राहण्यास नकार दिला होता कारण तिला पुढे अभ्यास करायचा होता. परंतु मॅट्रिकच्या परीक्षेत ती यशस्वी होऊ शकली नाही. पुढे १० वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. [४]

करिअर[संपादन]

सेलिना परवीनची १९५७ मध्ये मिटफोर्ड हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची नोकरी करत होत्या. त्यांनी १९५९ मध्ये पागोल रोकेया हॉलमध्ये मॅट्रॉन म्हणून काही काळ काम केले. स.न. १९६० मध्ये अजीमपूर बेबी होममध्ये शिक्षिका म्हणून सामील झाल्या. त्यांनी १९६५ मध्ये सलीमुल्ला अनाथालयात काही काळ काम केले. नंतर १९६६ मध्ये 'सप्ताह बेगम'च्या संपादक म्हणून सचिवाचे पद भूषिवले. स.न. १९६७ मध्ये सेलिना परवीन साप्ताहिक ललनामध्ये पत्रकार म्हणून सामील झाल्या. त्यानंतर त्यांनी एका राजकारणीशी लग्न केले. त्या विविध नियतकालिकांसोबत काम करायच्या आणि स्वतःचे मुक्ती समर्थक [२] नियतकालिक प्रकाशित करायच्या. [४] त्यांनी साप्ताहिकाची कमाई स्वातंत्र्य नायकांना मदत करण्यासाठी वापरली. [२] शैलालिपीमध्ये, सेलिना परवीन ह्या प्रोफेसर मुनीर यांच्यासह प्रमुख व्यक्तींचे लेख प्रकाशित करत असत. नंतर भविष्यात चौधरी, पत्रकार शाहिदुल्ला कैसर, जहीर रायहान आणि एएनएम गोलाम मुस्तफा, रायहान वगळता इतर सर्व अल-बद्रचे लक्ष्य बनले. [२] [५] जहीर रायहान ३० जानेवारी १९७२ रोजी आपला भाऊ शाहिदुल्ला कैसरच्या शोधात घर सोडून गेला, पण परतला नाही. [६]

मृत्यू[संपादन]

१३ डिसेंबर १९७१ रोजी इतर बौद्धिक शहीदांप्रमाणे सेलिना परवीनला अर्धसैनिक दल अल-बद्रच्या सदस्यांनी पकडले. तिचा मुलगा सुमॉन फक्त ७ वर्षांचा होता. [७] १४ डिसेंबर रोजी तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह नंतर रायरबाजार बोद्धभूमी येथे सापडला. डोळ्यावर पट्टी बांधून एका व्यक्तीने न्यायालयाला साक्ष दिली की, त्याने एका स्त्री सेलिना परवीनला ओरडताना आणि अल-बद्र माणसांना तिच्या आयुष्यासाठी भीक मागताना ऐकले होते. तिला एक मूल असल्याने तिला सोडून देण्याचे आवाहन केले. त्या मुलाची काळजी घेणारे कोणीही नव्हते तरीही क्रूर मारेकऱ्यांनी तिला सोडले नाही. साक्षीदाराने सांगितल्याप्रमाणे तिला गोळ्या मारून मारण्यात आले होते. [२] [७] तेथे असणऱ्या कैद्यांपैकी एकच कैदी जिवंत राहिला होता. तो हाताला बांधलेली दोरी सोडून पळूण्यात यशस्वी झाला होता. त्याने गोळ्या घालण्यासाठी बाहेर काढण्यापूर्वी तेथील कैद्यांवर केलेल्या अत्याचारांचे वर्णन केले. पीडितांमध्ये, सेलिना परवीन नंतर दोन जावघेण्या जखमांसह सापडली. त्यातील एक डोळ्यात आणि एक पोटात झाडलेल्या दोन गोळ्यामुळे झालेल्या होत्या. [७]

३ नोव्हेंबर २०१३ रोजी लंडनमध्ये राहणारे मुस्लिम नेते चौधरी मुईन-उद्दिन आणि अमेरिकेत असणारे अशरफुझ जमान खान यांना डिसेंबर १९७१ मध्ये १८ लोकांच्या अपहरण आणि हत्येत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांना त्यांच्या अनुपस्थित शिक्षा सुनावण्यात आली. ढाका विद्यापीठाचे नऊ शिक्षक, सेलिना परवीनसह सहा पत्रकार आणि तीन डॉक्टर हया सर्व लोकांची यादी होती. [२] [५]

हे देखील पहा[संपादन]

  • बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या पत्रकारांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "Profiles of martyred intellectuals". The Daily Star. 14 December 2006. Archived from the original on 2013-12-03. 7 November 2013 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f Khan, Tamanna (4 November 2013). "It was matricide". The Daily Star. 7 November 2013 रोजी पाहिले.
  3. ^ a b Hossain, Selina (2012). "Parvin, Selina". In Islam, Sirajul; Jamal, Ahmed A. (eds.). Banglapedia: National Encyclopedia of Bangladesh (Second ed.). Asiatic Society of Bangladesh.
  4. ^ a b স্মৃতি: ১৯৭১, Volume 4, Page 98, Bangla Academy, आयएसबीएन 984-07-3351-6 चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "academy" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  5. ^ a b Chowdhury, Syed Tashfin (3 November 2013). "UK Muslim leader Chowdhury Mueen Uddin sentenced to death in Bangladesh". The Independent. London. 7 November 2013 रोजी पाहिले.
  6. ^ Ferdous, Fahmim (19 February 2013). "Zahir Raihan: Capturing national struggles on celluloid". The Daily Star. Archived from the original on 2013-11-10. 9 November 2013 रोजी पाहिले.
  7. ^ a b c Hoque, Mofidul (14 December 2013). "Long Walk to Justice". The Daily Star. Archived from the original on 2013-12-31. 31 December 2013 रोजी पाहिले.

पुढील वाचन[संपादन]