सूर्याजी पिसाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्याजी पिसाळ (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) हा दख्खनेतील (वर्तमान महाराष्ट्रातील) वाई प्रांताचा देशमुख होता. हा आपल्या राजकीय कारकिर्दीत, मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता.

     ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ साली प्रसिद्ध केलेल्या ले.शां.वि. आवळसकरांच्या रु.४ किमतीच्या पुस्तकात त्यांनी रायगड प्रकरणी सुर्याजी पिसाळ (१६८९) आणि रा.य.नाईक (१८१८) हे दोघेही मोघलांस व इंग्रजांस फ़ितूर झाले या गोष्टी संशयातीत आहेत, दोघेही निर्दोष आहेत,असे सांगितले आहे. त्यांचे व अस्मादिकांचे तसे पक्के मत झाले आहे.

घटनाक्रम असा- संभाजीराजे गिरफ़्तार राजारामांचे मंचकारोहण १ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले.संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी ठार झाले.रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली.त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.

         रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकरने कैदेतील मानाजी मोरे इ.ना सोडले तर यसजी व सिदोजी फ़र्जंद यांचा कडेलोट केला.म्हणजे रायगडावर सुर्याजी पिसाळ त्यावेळी किल्लेदार नव्हते.राजप्रतिनीधी म्हणुन राजाराम राज्यकारभार १२ फ़ेब्रुवारी १६८९ पासुन पाहू लागले.कारण शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ सात वर्षाचे होते.हा दुरदर्शीपणा येसूबाईंचा.मराठ्यांची राजधानी व नवीन राजा यांना ताब्यात घेण्यास आसदखानपुत्र इतिकादखानने रायगडला २५ मार्चला वेढा घातला.

संदर्भ[संपादन]

  • मराठा रियासत -गो.स.सरदेसाई
  • सूर्याजी पिसाळ-औरंगजेब पत्रव्यवहार