Jump to content

सूर्यमासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेंट्रार्किडी मत्स्यकुलातील अनेक प्रजातींमधील गोड्या पाण्यातील माशांना व मोलिडी मत्स्यकुलातील सागरी जातींच्या गटाला हे नाव देतात. सागरी सूर्यमासे बहुधा समशीतोष्ण व उष्णकटिबंधांतील समुद्रांत पाण्याच्या पृष्ठभागाजवळ विश्रांती घेत असलेले आढळतात.

सागरी सूर्यमाशाच्या मोला प्रजातीत दोन जाती आहेत. दोन्ही जातींचे मासे मोठे, बळकट व दणकट असतात. त्यांचे तोंड लहान; श्रोणिपक्ष व वाताशय नसते; त्वचा खरबरीत व जाड असल्याने ते बंदुकीच्या गोळीने जखमी होत नाहीत. ते शेपूट नसल्यासारखे दिसतात. सामान्य सागरी सूर्यमासा (मोला मोला) व तीक्ष्ण शेपटीचा सूर्यमासा (मॅस्टुरस लॅसिओलॅटस ) हे जवळजवळ ३·३५ मी. पर्यंत लांब असून त्याचे वजन दोन टनांपर्यंत असते. ते सागराच्या पृष्ठभागावर तरंगणारे विविध प्रकारचे अन्न आणि अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) जीव व लहान मासे खातात. शांत वातावरणात ते सूर्यस्नान करताना (पाण्यात डुबक्या मारताना) आढळतात. ते एकावेळी ३,००० दशलक्षांपर्यंत अंडी घालू शकतात; परंतु त्यातील बरीचशी अंडी मृत असतात. सूर्यमासे डबकी, सरोवरे व संथ प्रवाहांत राहतात. त्यांना वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्रौढ अवस्था प्राप्त होते. त्यावेळी नर आपल्या शेपटीचा व शरीराचा उपयोग करून तळाशी वाळूत सु. ६० सेंमी. रुंद उथळ घरटे तयार करतो. मादीने अंडी घातल्यानंतर त्यांचे निषेचन (फलन) झाल्यावर नर तिला तेथून हुसकावून लावतो. अंड्यातून पिले बाहेर पडून ती घरट्याबाहेर पडण्याइतपत मोठी होईपर्यंत नर घरट्याचे रक्षण करतो.

ब्ल्यूगिल सूर्यमासा सरासरीने १७–२० सेंमी. लांब असून त्याचे वजन २२० ग्रॅ. असते. तथापि त्याची चांगली वाढ झाल्यावर तो ३०–३५ सेंमी. लांब होतो आणि त्याचे वजन ६५० ग्रॅ. होते; परंतु त्यांची संख्या भरमसाट वाढल्यास कवचधारी प्राणी, गोगलगायी,सूर्यमासा (लेपोमिस गिब्बोसस) कीटक व डिंभ (अळ्या) हे त्यांचे खाद्य कमी पडल्यामुळे त्यांची शारीरिक वाढ खुंटते. जेथे परिस्थिती अनुकूल असेल तेथे शेतातील खाचरात काळ्या बासबरोबर ब्ल्यूगिल सूर्यमासा विस्तृत प्रमाणावर आणतात.


संदर्भ

[संपादन]

[१]

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/93893094d92f92e93e93893e