सुरेंद्र चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुरेंद्र चव्हाण हे पुणे येथील गिर्यारोहक आहेत. मे १९, १९९८ रोजी त्यांनी माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. ते हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पथकात होते. सुरेंद्र चव्हाण यांना १९९८ च्या मोसमातील एव्हरेस्टच्या पहिल्या चढाईचा मान मिळाला.[१] चव्हाण हे एव्हरेस्ट सर करणारे पहिले मराठी आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.k2news.com/archive/98.htm