सुधीर राशिंगकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. सुधीर राशिंगकर हे व्यवसाय व व्यवस्थापन विषयांचे तज्ज्ञ असून त्याविषयावर लेखन करतात.

राशिंगकर हे द्विपदवीधर (B.E. (Mech. & Elect) व F.I.E.(Fellow of The Institution of Engineers) असून व्यवसाय-व्यवस्थापन या विषयाचे पीएच.डी.आहेत. अनेक विद्यापीठांत ते याच विषयाचे पीएच.डी.साठीचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा विपणनाचा (खरेदी-विक्रीचा, मार्केटिंगचा) स्वतंत्र व्यवसाय असून व्यवसायाच्या आणि अन्य निमित्ताने राशिंगकरांनी संपूर्ण भारतभर तसेच जगभरातल्या अनेक देशांत ३०हून जास्त वर्षे विस्तृत प्रवास केला आहे. त्यांचा अनेक सामाजिक, व्यावसायिक व सांस्कृतिक संस्था-संघटना यांच्याशी संबंध असून त्यांनी काही संस्थांमधील पदेही भूषविली आहेत.

राशिंगकर रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. या सेवाभावी संघटनेच्या कार्यात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

व्यवसाय मार्गदर्शन आदी विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. विविध विषयांवरील सात-आठ मासिकांमध्ये त्यांनी अनेक वर्षे सातत्याने लिखाण केले आहे.

पुस्तके[संपादन]

सुधीर राशिंगकर यांनी लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.

  • अपयशाकडून यशाकडे
  • आपली रोटरी, आपले फौंडेशन
  • सोनी कॉर्पोरेशन'चा शिल्पकार : आकिओ मोरिता
  • उद्योजक व्हा!
  • गीता परिचय
  • संपूर्ण गीताभ्यास
  • सुलभ गीताभ्यास
  • ग्राहकसेवेचा मूलमंत्र
  • तुमचे भविष्य तुमच्या हाती
  • थिंक बिग (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॉ. बेन्जामिन कार्सन, सेसिल मर्फी)
  • दैवी हात (अनुवादित; ज्या शल्यविशारदाने अर्भकांना नवीन जीवन जगण्याची संधी दिली, त्या डॉ. बेन्जामिन (बेन) कार्सनची Gifted Hands नावाची आत्मकहाणी) (सहलेखक - सेसिल मर्फी)
  • पिझ्झा टायगर : तीस मिनिटात घरपोच पिझ्झाचा किमयागार (अनुवादित, मूळ टाॅम मोनाघनचे इंग्रजी आत्मचरित्र)
  • फ्यूवर व्हिजन प्लॅन
  • बदलेल तो जिंकेल
  • भवितव्य उद्याचे
  • व्यावसायिक यशाच्या गुरूकिल्ल्या
  • रोटरीचा श्रीगणेशा
  • रोटरीची तोंडओळख
  • रोटरीतील व्यवसायसेवा
  • वृत्तपत्रलेखन - तंत्र आणि मंत्र
  • गुंतवणूकसम्राट वाॅरन बफे : शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व दानशूर व्यक्ती होण्याचा एक प्रेरणादायी प्रवास; अनुवादित)
  • स्वयंविकासाची वाटचाल

सन्मान[संपादन]

सुधीर राशिंगकरांना मिळलेले सन्मान:

  • बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्धी
  • विविध संस्थां-संघटनांकडून उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
  • रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद