सुजाता देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुजाता देशमुख या संपादक, अनुवादक आणि पत्रकार आहेत. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूझ ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या. ’मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे संपादकपदही त्यांनी सांभाळले आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.[१] त्यांनी बऱ्याच इंग्रजी/हिंदी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

सुजाता देशमुख यांची पुस्तके[संपादन]

  • गौहर जान म्हणतात मला (अनुवादित, मूळ पुस्तक ‘माय नेम इज गौहर जान’, लेखक विक्रम संपत). या पुस्तकाला साहित्य अकादमीचा २०१७ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
  • तिची मोहिनी (Under Her Spellचा मराठी अनुवाद, मूळ लेखक - दिलीप पाडगावकर)
  • दहशतीच्या छायेत - डायरी एका काश्मिरी अनामिकाची (अनुवादित, मूळ लेखक - तेज एन. धर)
  • नीलची शाळा 'समरहिल' (अनुवादित, मूळ लेखक - ए.एस. नील, सहअनुवादक हेमलता होनवाड)
  • बाइकवरचं बिऱ्हाड - पुणे ते लेह ते श्रीनगर / एका कलंदराचा प्रवास) (अनुवादित मूळ लेखक अजित हरीसिंघानी)
  • माझंही एक स्वप्न होतं...वर्गीस कुरियन (अनुवादित आत्मचरित्र, मूळ लेखक - वर्गीस कुरियन)
  • हत्या बेनझीर भुत्तोंची : का आणि कशी? (अनुवादित, मूळ लेखक - आमिर मीर)

पुरस्कार[संपादन]

  • सुजाता देशमुख यांनी ‘माय नेम इज गौहर जान’ या विक्रम संपत लिखित इंग्रजी पुस्तकाचा ‘गौहर जान म्हणतात मला’ या नावाचा अनुवाद केला आहे. या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मंथन महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "श्रीकांत देशमुख, सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार". महाराष्ट्र टाइम्स. २१ डिसेंबर २०१७. २६ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.