सीसराम ओला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सीसराम ओला (जून ३०, इ.स. १९२७ - १५ डिसेंबर, इ.स. २०१३) हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार होते. हे मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह सरकारमध्ये खाणमंत्री होते. ते इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तिवारी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून राजस्थान राज्यातील झुनझूनू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.