Jump to content

सीताराम शिवराम लोटलीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सीताराम शिवराम लोटलीकर (जन्म : दापोली-कोकण, १७ ऑगस्ट १८९०; - ११ ऑक्टोबर १९३६) हे मराठी लेखक, कादंबरीकार, चरित्रकार आणि आरोग्यविषयक पुस्तकांचे कर्ते होते.

लोटलीकरांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले होते. असे असले तरी विविध विषयांवरील त्यांचे वाचन दांडगे होते. या वाचनप्रेमामुळेच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली.

उपजत लेखनाची गोडी असणारे लोटलीकर हे अच्युतराव कोल्हटकरांच्या 'संदेश' पत्राच्या संपादन मंडळात काही काळ होते. तत्पूर्वी ते खानापूरच्या लोकमित्र पत्राचे काही काळ सहसंपादक होते. १९१७ ते २० या काळात 'संदेश'मधून बरेच लेखन त्यांनी केले. समाजाला मार्गदर्शन करणारी 'राष्ट्रजीवनमाला ' आणि ‘आरोग्यविषयक’ मार्गदर्शन करणारी ‘नवजीवनमाला’ या पुस्तकमाला त्यांनी काढल्या. साधी सोपी उद्बोधक आणि आकर्षक भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.

सीताराम शिवराम लोटलीकरांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • आत्मोन्नती
  • आरोग्य चिंतामणी
  • जळो ते प्रेम (कादंबरी)
  • दडपशाही (कादंबरी)
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी (चरित्र)
  • मानसचिकित्सा
  • मार्ग व मार्गदर्शन ('राष्ट्रजीवनमाले'मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले पुस्तक)
  • पंजाबचा सिंह लाला लजपतराय (चरित्र)
  • शक्तिसंरक्षण
  • शांताराम (कादंबरी)
  • संजीवन विद्या
  • सरोजिनी नायडू (चरित्र)
  • सामर्थ्य, समृद्धी व शांती
  • सामर्थ्य संवर्धन (आहार व व्यायामविषयक पुस्तक) (१९१७)
  • स्वराज्याचा उषःकाल ('राष्ट्रजीवनमाले'मधून क्रमश: प्रसिद्ध झालेले पुस्तक)