Jump to content

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदार एकरकमी ठेव ऐवजी ठराविक काळाने छोटी रक्कम गुंतविता येते. ही गुंतवणूक दर आठवड्याला, महिन्याला किंवा दर ३ महिन्याला करता येते.[]

आढावा

[संपादन]

एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये, एक ठराविक रक्कम ठराविक कालावधी नंतर बँक खात्यामधून काढून काही विशेष म्युच्युअल फंड्समध्ये गुंतविण्यात येते. गुंतवणूकदाराला निव्वळ मालमत्ता मुल्यानुसार काही भाग दिले जातात. प्रत्येक वेळी जेव्हा रक्कम गुंतविण्यात येते तेव्हा गुंतवणूकदाराला आणखी भाग दिले जातात.

या धोरणानुसार गुंतवणूकदार अस्थिर बाजाराचा अंदाज घेण्याच्या चिंतेतून मुक्त होतो. या पद्धतीत गुंतवणूकदाराला जेव्हा किंमत कमी असते तेव्हा जास्त भाग मिळतात आणि जेव्हा किंमत जास्त असते तेव्हा कमी भाग मिळतात. दीर्घकाळात प्रत्येक भागाची सरासरी खरेदी किंमत कमीत कमी बसते.[][]

एसआयपी ही एक शिस्तबद्ध गुंतवणूक योजना मानली जाते. ही योजना लवचिक असते कारण यात गुंतवणूकदार कधीही गुंतवणूक करणे थांबवू शकतात किंवा गुंतवणुकीची रक्कम कमी किंवा अधिक करू शकतात. एसआयपी ही सहसा किरकोळ गुंतवणूकदारांना सुचवली जाते ज्यांच्याकडे सक्रीय गुंतवणुकीसाठी वेळ आणि संसाधने नाहीत.[]

एसआयपी गुंतवणूक त्या गुंतवणुकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे ज्यांना आर्थिक बाजाराचे ज्ञान तितकेसे चांगले नसते. प्रत्येक भागाची सरासरी खरेदी किंमत कमीत कमी बसणे हा एसआयपीचा एक फायदा आहे तसेच गुंतवणुकीत सातत्य असल्याने बाजारात असलेल्या कुठल्याही संधी सुटत नाहीत.

भारत

[संपादन]

भारतामध्ये एसआयपी साठीचे आवर्ती देयक, इलेक्ट्रोनिक क्लिअरिंग सर्विसेसचा वापर करून करता येते.[] काही म्युच्युअल फंड्समध्ये, कर सवलतसुद्धा मिळते. पण सहसा अश्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये ३ वर्षाचा लॉकिंग कालावधी असतो. हे म्युच्युअल फंड्स अनेक कंपन्यांकडे उपलब्ध आहेत ज्यात कोटकचा ही समावेश आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c "सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय? हे कस काम करत?" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "डॉलर खर्च सरासरी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "इलेक्ट्रोनिक क्लिअरिंग सर्विसेस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन" (इंग्लिश भाषेत). 2017-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)