Jump to content

सिमोन दि माँतफोर्त (लीस्टरचा ६वा अर्ल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीस्टरमधील माँतफोर्तचा पुतळा

सिमोन दि माँतफोर्त (१२०८ - ४ ऑगस्ट, १२६४) हा मध्यकालीन इंग्लंडमधील सरदार आणि जमीनदार होता. मूळचा फ्रांसमधील माँतफोर्त इंग्लंडच्या राजा दुसऱ्या हेन्रीविरुद्ध झालेल्या बॅरनांच्या युद्धातील प्रमुख सेनापती होता. युद्धाच्या सुरुवातीसच मिळालेल्या विजयांच्या जोरावर तो देशाचा सत्ताधारी झाला व त्याने इंग्लंडच्या शासनामध्ये मोठे बदल घडवून आणले.

माँतफोर्तने आपल्या राजवटीत इंग्लंडच्या संसदेच्या दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. ऑक्सफर्ड संसदेने हेन्रीचे अमर्याद अधिकार काढून घेतले, तर माँतफोर्तची संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या बैठकीत त्याने शहरांतील सामान्य नागरिकांनाही प्रतिनिधित्व दिले. [] या कारणास्तव माँतफोर्तला आधुनिक संसदीय लोकशाहीच्या पूर्वजांपैकी एक मानले जाते. [] अर्ल ऑफ लीस्टर या नात्याने त्याने ज्यूंना त्या शहरातून हद्दपार केले. इंग्लंडची सत्ता हातात आल्यावर त्याने जप्ती बसवून ज्यूंनी इतरांना दिलेली कर्जे रद्द केली. त्याच्या पाठीराख्यांनी लंडन, वूस्टर आणि डर्बी येथील ज्यूंची कत्तल केली होती. यात विंचेस्टर ते लिंकनपर्यंत अनेक ठिकाणी ज्यूं बळी पडले. [] [] [] एक वर्षाच्या सत्तेवर राहिल्यानंतर, एव्हेशमच्या लढाईत हेन्रीला निष्ठावान असलेल्या सैन्याने माँतफोर्तचा वध केला. []

संदर्भ

[संपादन]