सितानाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सितानाईक तांडा हे गाव औरंगाबाद जिल्हा, तालुका कन्नड मधिल एक प्रगतशिल बंजारा समाजाचे गाव आहे. बंजारा समाजाच्या वसाहतीला तांडा असे म्हणतात. सितानाईक तांडा हे कन्नड तालुक्यापासून 17 कि.मी. अंतरावर दक्षिणेस वसलेले असून या गावात 95% बंजारा समाज वास्तव्यास आहे. या गावाच्या नावात एक गूढ म्हणजे या गावाला 'सितानाईक तांडा' हे नाव तांड्यातील नायक सिताराम यमजी राठोड यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे. या गावाचे मुखिया अर्थात नाईक हे सिताराम राठोड होते. संपुर्ण तांड्याची जबाबदारी या नायकांवर असायची. आजही बंजारा समाज तांड्यातील प्रमुखाला नायक किंवा नाईक असेच म्हणतात. बंजारा संस्कृतीप्रमाणे तांडयाची ओळख ही नाईकांच्या नावावरून होत असे. त्यामुळे आजही बंजारा तांड्याला राम नाईक तांडा, सितानाईक तांडा, रामजी नाईक तांडा अशा नावाने तांडे पाहायला मिळतात. याशिवाय 'गड' म्हणून देखील तांडयाचा उल्लेख होतो. उदा.गहुलीगड , पोहरागड, सेवागड,वसंतगड,सुधागड,उमरीगड, सेवागड, रूईगड, वरोलीगड,गराशागड अशा नावाने सुद्धा बंजारा तांडयाचा उल्लेख होतो.

सितानाईक तांड्याचे सामाजिक महत्त्व[संपादन]

तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत असून एकूण लोकसंख्या 1800 आहे.स्त्री 600 तर पुरुष 800 असून मुले 200, मुली 100 , प्रौढ 100 आहेत. (2011 नूसार) गावात सन 2020 पासून बुधवारी आठवडी बाजार भरवला जातो.गुलाब लक्ष्मण राठोड आणि सूदाम मच्छीराम पवार यांच्या समाजसेवेच्या भावनेतून गावात आठवडी बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे .