सिडनी पोलाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिडनी अर्विन पोलाक (१ जुलै, १९३४ - २६ मे, २००८) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. पोलाक यांनी २० पेक्षा अधिक चित्रपट आणि १० दूरचित्रवाणीमालिकांचे दिग्दर्शन केले. त्यांनी ४४ चित्रपटांचे निर्माण केले. याशिवाय त्यांनी अंदाजे ३० चित्रपट आणि दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनयही केला. त्यांना आउट ऑफ आफ्रिका या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि निर्माणासाठी १९८५चा अकॅडेमी पुरस्कार देण्यात आला.[१] त्यांच्या दे शूट हॉर्सेस, डोन्ट दे? (१९६९) आणि टूट्सी (१९८२) या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नामांकन मिळाले होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "THE 58TH ACADEMY AWARDS | 1986". July 23, 2017 रोजी पाहिले.