Jump to content

सिंचन घोटाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंचन घोटाळा महाराष्ट्राच्या सिंचन विभागात २००० च्या दशकात झालेला एक भ्रष्टाचाराचा घोटाळा आहे.[][] २०११-१२ च्या राज्य आर्थिक सर्वेक्षणातून असे उघड झाले की महाराष्ट्र सरकारने गेल्या दशकात जरी ७०,००० कोटी रुपये सिंचन विकास कामांवर खर्च केले असले तरी राज्यातील सिंचन क्षेत्र फक्त ०.१% ने वाढले आहे. या सर्वेक्षणानुसार २०००-२००१ मध्ये एकूण लागवडीखालील जमिनीपैकी १७.८% क्षेत्रावर सिंचन क्षमता होती, २००९-२०१० मध्ये ते लागवडीखालील सिंचन क्षेत्र फक्त १७.९% एवढेच झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "What is Maharashtra irrigation scam" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "Irrigation scam, a drain on Maharashtra's exchequer" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१२ रोजी पाहिले.
  3. ^ "Economic survey of Maharashtra 2011-12 (महाराष्ट्राचे आर्थिक सर्वेक्षण २०११-१२; पान क्रमांक ११०)" (PDF) (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१२ रोजी पाहिले.