सावरकर (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावरकर हे भारतीय राजकारणी, क्रांतिकारक आणि लेखक विनायक दामोदर सावरकर यांचे दोन भागांचे चरित्र आहे.चरित्रकार विक्रम संपत यांनी लिहिलेले आणि पेंग्विन वायकिंगने प्रकाशित केले. पहिल्या भागाचे उप-शीर्षक इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट, १८८३-१९२४ (Echoes from a Forgotten Past, 1883-1924) आहे आणि दुसरा भाग अ कॉन्टेस्टेड लेगसी १९२४-१९६६(A Contested Legacy, 1924-1966) आहे. या मालिकेत दोन पुस्तकांचा समावेश आहे, पहिल्या खंडात सावरकरांच्या १८८३ ते १९२४ या काळातील जीवनाबद्दल सांगितले आहे. तर, समारोप खंड १९२४ ते १९६६ या वर्षावर केंद्रित आहे. संपतच्या संशोधनात सावरकर समग्रा, सावरकरांच्या कुटुंबाची मुलाखत घेणे, स्मारकांना भेट देणे, त्यावेळची वर्तमानपत्रे वाचणे आणि संबंधित ग्रंथालये आणि संस्थांमध्ये संशोधन करणे यांचा समावेश होता.


मराठी अनुवाद:

खंड १ सावरकर विस्मृतीचे पडसाद, अनुवादक :मंजिरी मराठे रणजित सावरकर (SAVARKAR ECHOES FROM A FORGOTTEN PAST 1883-1924 - VISMRUTICHE PADSAD)

खंड २ सावरकर – एक वादग्रस्त वारसा ( १९२४ – १९६६ ) अनुवादक :मंजिरी मराठे रणजित सावरकर