सान बर्नार्डिनो काउंटी (कॅलिफोर्निया)
Appearance
(सान बर्नार्डिनो काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान बर्नार्डिनो काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान बर्नार्डिनो (निःसंदिग्धीकरण).
सान बर्नार्डिनो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सान बर्नार्डिनो येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,८१,६५४ इतकी होती.[२]
सान बर्नार्डिनो काउंटी व आसपासच्या प्रदेशास इनलँड एम्पायर असे नामाभिधान आहे. ही अमेरिकेतील सगळ्यात मोठी काउंटी आहे. हिचा विस्तार जवळजवळ वेस्ट व्हर्जिनिया राज्याइतका आहे.
सान बर्नार्डिनो काउंटी रिव्हरसाइड-सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगरक्षेत्राचा भाग आहे जो लॉस एंजेलस महानगरक्षेत्राचा भाग आहे.
या काउंटीची रचना १८५३मध्ये झाली.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "San Bernardino County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.