साचा चर्चा:साचा लष्कराचे भाग
Appearance
सुधारणा
[संपादन]या साच्याचे वर्तमान नाव बरेच संदिग्ध वाटत आहे. कोणते सैन्य ? भारताचे की अन्य कुणा एका देशाचे की सर्व देशांचे, ते नावातून अजिबात स्पष्ट होत नाही. ज्ञानकोशात जागतिक व्याप्ती आणि नेमकेपणा आवश्यक असतो, हे नाव देताना ध्यानी राखावे.
खेरीज लष्कर हे नाव बऱ्याचदा सैन्य व भूदल अश्या दोन्ही अर्थांमध्ये योजले जाते, व त्यांतून अनेकदा गल्लत घडते असे निरीक्षण आहे. त्यामुळे जर भारतीय भूदलाबद्दल माहिती द्यायची असेल, तर "भारताचे भूदल" असे शीर्षकात निस्संदिग्ध लिहावे किंवा जर भारताच्या सर्व दलांबद्दल/ एकंदरीत सैन्याबद्दल लिहायचे असेल, तर "भारताचे सैन्य" असे नोंदवावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०६, १७ जुलै २०११ (UTC)