साचा चर्चा:प्रमाणेतरमराठीओळ
Appearance
असा साचा असायला हरकत नाही, पण प्रमाणेतर मराठी लिहिण्यासाठी मराठी लेखनात काही संकेत मुळातच रूढ आहेत, ते असे :
१. प्रमाणेतर लेखन असलेले शब्द किंवा वाक्ये एकेरी अवतरण चिन्हांमध्ये बंदिस्त करणे. ते लेखन जर एखाद्या माणसाची उक्ती किंवा एखाद्या लेखाचा हिस्सा असलेले अवतरण असेल तर कधीकधी दुहेरी अवतरणचिन्ह वापरतात.
२. असे शब्द, असे वाक्प्रचार किंवा अशी वाक्ये तिरप्या मुद्राक्षरांत छापणे. हा पर्याय इंग्रजी लिपीतही वापरला जातो. वाक्यात येणारे लॅटिन, ग्रीक किंवा फ्रेन्च शब्द तिरप्या अक्षरांत छापतात.
उदा० ad hoc, vice versa, par avion, ad verbum , reductio ad absurdum, pari passu, Ursa Major, वगैरे.....J (चर्चा) १२:०५, १३ डिसेंबर २०१३ (IST)