सागरी उत्पादन व निर्यात विकास प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सागरी उत्पादन व निर्यात विकास प्राधिकरण (लघुरुप : एम्पेडा) या संस्थेची स्थापना इ.स. १९७२ साली भारत सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयांतर्गत झाली. खोल समुद्रातील मासेमारी, तिचे रक्षण व व्यवस्थापन करणे, निर्यात केंद्र व मासेमारी नौका यांची नोंदणी करणे, उच्च दर्जाच्या मासळी उत्पादनाकरीता नियमावली तयार करुन त्याची अंमलबजावणी या संस्थेमार्फत केली जाते.

सागरी उत्पादनांची निर्यात व तिच्यामध्ये सुधारणा हे एम्पेडाचे मुख्य कार्य आहे. मत्स्य पदार्थांची गुणवत्ता वाढविण्याकरिता तांत्रिक तसेच वित्तीय मदतही या प्राधिकरणाकडून केली जाते.