सांता रोसा (कॅलिफोर्निया)
Appearance
सांता रोसा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सोनोमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१४ च्या अंदाजानुसार १,७४,१७० होती. या शहराच्या आसपास द्राक्षांचे मळे व त्यापासून वाइन बनविणारे छोटे उद्योग आहेत.