सांजभयाच्या साजणी (काव्यसंग्रह)
Appearance
सांजभयाच्या साजणी हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पाचवा काव्यसंग्रह होय. इ. स. २००६ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
अर्पणपत्रिका
[संपादन]आपला प्राचीन काव्यधर्म नव्याने उजळून दाखविणाऱ्या एका(च) सांजभयाच्या साजणीस कवीने हा संग्रह अर्पण केलेला आहे.
परिचय
[संपादन]कवीच्या आत्मनिवेदनानुसारच 'अगदी सुरुवातीच्या अर्धकच्च्या (की अर्धपिकल्या) कवितांचा' या संग्रहात समावेश आहे. इतर सर्व काव्यसंग्रहांच्या तुलनेत या संग्रहातील कविता सुगम वाटतात.