Jump to content

सहाय्य:नवीन लेख कसा लिहावा/पहिली पायरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्या विषयावर आपल्याला लेख लिहावयाचा आहे त्याचे नाव सुरूवातीला मुखपृष्ठावरील शोधखिडकीत टाकून त्यापुढे असलेल्या शोधभिंगावर टिचकी मारा. समजा तुम्हाला कुशावर्त या विषयावर लेख निर्माण करावयाचा आहे तर खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे कृती करा.
शोध घेतल्यानंतर त्या विषयावर विकिपीडियात लेख उपलब्ध नसल्यास सुरुवातीच्या ओळीत मराठी विकिपीडियावर कुशावर्त हा लेख लिहा असे आपणास दिसेल. हा लेख उपलब्ध नसल्यास कुशावर्त हा शब्द तुम्हाला लाल रंगात दिसेल. त्या लाल रंगात दिसणाऱ्या शब्दावर टिचकी मारावी.
आता आपल्याला कुशावर्तची निर्मिती सुरू आहे असा संदेश दिसेल व त्याखाली असलेल्या संपादन खिडकीत तुम्हाला लेखात टाकावयाचा मजकूर लिहिता येईल.
संपादन खिडकीत मजकूर लिहून झाल्यावर खाली बदलांचा आढावा यापुढे थोडक्यात काय केले ते लिहा व त्याखाली दिसणाऱ्या झलक पाहा बटणावर टिचकी मारा

[पुणतांबा : १]

  • माहिती योग्य वाटल्यास "जतन करा " (SAVE) बटनावर क्लीक करा .
  • विकिपीडियावरील आपल्या योगदानासाठी अनेक अनेक शुभेच्छा ....!


चुका उधृत करा: "पुणतांबा :" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="पुणतांबा :"/> खूण मिळाली नाही.