Jump to content

सहाय्य:खाते प्रवेश करताना अडचण ?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑगस्ट २०१४ पासून मराठी लेखन विषयक माहिती आणि साहाय्य सुधारणांमुळे खाते नावांची निर्मीती आधी पेक्षा अधिक प्रमाणात मराठी देवनागरी लिपीतून होऊ लागली आहे. पण नवीन खाते तयार करताना नवागतांकडून घाई घाईत त्यांना स्वत:सही अनपेक्षीत शुद्धलेखन चुका होत असाव्यात असे दिसते.


खासकरून नवीन सदस्य खात्यांची निर्मिती केली जाताना ज्या नवागत सदस्यांची नावे अकारात्न आहेत अशा पैकी अक्षरांतरण टायपींगचा सराव नसलेल्या मंडळींच्या सदस्य खाते नावातील शेवटचे अक्षर, संबंधीत सदस्यांच्या अनवधानाने खालील उदाहरणातल्या प्रमाणे हलंत (पायमोडके, म्हणजे हलंत ऐवजी हलंत् असा पाय मोडका राहून जाणे) राहत असल्याचे लक्षात आले आहे. अशा नवागत सदस्यांनी लॉग आऊट करून पुन्हा हलंत न घेता लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना खाते प्रवेश (सनोंद प्रवेश) सहसा शक्य होणार नाही. तुमच्याकडून असे अनवधानाने असे चुकीचे लेखन घडले असल्यास १) आपण नवे सदस्य खाते नुकतेच बनवले असल्यास नवीन सदस्य खात्यांची नोंद येथे पाहता येईल २) या सदस्य यादीत पुन्हा शोधता येतील ३) विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या येथे नावात बदल करण्याची विनंती कशी करावी याची माहिती घेता येईल ४) याच देवनागरी मराठी नावात लेखनाच्या संदर्भाने समस्या आली असल्यास याच पानावर खाली आपल्या समस्या लिहा म्हणजे अधिक अभ्यास करून काही उपाय योजना करता आल्यास पहाता येईल. ५) इंग्रजी/रोमन लिपी वापरूनच्या नावा संदर्भातील लॉग इन समस्या या पानाच्या चर्चा पानावर लिहा म्हणजे सर मिसळ होणार नाही.


खालील काही उदाहरणे पहा :

क्रमांक लेखनत्रुटी शक्यता असलेले सदस्य नाव त्रुटी विरहीत नाव काय असू शकेल आणि बदल शक्य आहे का ? बदल केला अथवा नाही
सदस्य:योगेश् कर्ने योगेश कर्ने शक्य आहे
सदस्य:नन्द्कुमार् नन्दकुमार पण दुसरे खाते आधी पासून आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:साईनाथ् साईनाथ देवनागरी लिपीत उपलब्ध नाही पण इंग्रजीत आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:श्रीरम् श्रीराम पण दुसरे खाते आधी पासून आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:नितिन् नितिन पण दुसरे खाते नंतर बनवले गेल्याचे दिसते आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:स्वप्निल् स्वप्निल देवनागरी लिपीत उपलब्ध नाही पण इंग्रजीत आहे अधिग्रहणा शिवाय नाव बदल शक्य नाही नाही
सदस्य:िवशाल विशाल शक्य आहे
सदस्य:मादुरि बबन हवेलिकर
सदस्य:सचिन चव्हण सचिन चव्हाण शक्य आहे
१० सदस्य:राहुल् सुरेश् नार्कर् 'राहुल सुरेश नार्कर' शक्य आहे
११ सदस्य:मोईन्


देवनागरी/मराठी सदस्य खाते नावाचे लॉग इन/ प्रवेश करताना येणाऱ्या समस्या येथे खाली लिहा

[संपादन]

देवनागरी/मराठी सदस्य खाते नावाचे लॉग इन/ प्रवेश करताना येणाऱ्या समस्या येथे खाली आवर्जून लिहा (आपण समस्या लिहून संवाद साधल्या शिवाय नवागत लोकांच्या तांत्रिक अडचणी आम्हाला समजणार नाहीत). अर्थात तुमचे पासवर्ड फोनक्रमांक इमेल संपर्क पत्ते येथे मुळीच लिहू नयेत हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.